काँग्रेसच्या शिर्षनेतृत्वावर वैयक्तिक टिका केल्यास विचारमंचच्या माध्यमातुन उत्तर देणार - चेतनसिंह पवार
२२ नोव्हेंबर २०२० रोजी आद. राहुलजी गांधी विचारमंच, महाराष्ट्र राज्यची औरंगाबाद येथे अध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या अध्यक्षतेमध्ये सर्व साधारण कार्यकारिणी बैठक व नियुक्ती समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन प्रदेश कार्यध्यक्ष संजय शेलार, राज्य सल्लागार ॲड. सुरेश भगत, विजुभाऊ राजपुत, यश शिंगडा आदी उपस्थित होते.

यावेळी विचारमंचच्या राज्य उपाध्यक्षपदी कपिल ढोके, बालाजी नारवटे - जिल्हाध्यक्ष परभणी, मयूर रोहोकले - जिल्हाध्यक्ष अहमदनगर, राहुल मिनेकर जिल्हाध्यक्ष कोल्हापूर, विलासभाऊ गोत्मार- जिल्हाध्यक्ष अकोला, किरण काकडे - जिल्हाकार्याध्यक्ष औरंगाबाद, गौरव लहाने - शहराध्यक्ष औरंगाबाद, सतिश वेताळ - तालुकाध्यक्ष खुलताबाद, पंकज बोकील - तालुकाध्यक्ष फुलंब्री, राहुल साळवे - विधानसभाध्यक्ष गंगाखेड आदींची निवड करण्यात आली. शेतकरी, विद्यार्थी आणि गरीब यांना समोर ठेवून पुढील वाटचाल करणार तसेच यापुढे काँग्रेस पक्षाच्या शिर्षनेतृत्व वर वैयक्तिक टिका केल्यास उत्तर देण्याचे काम विचारमंचच्या माध्यमातुन दिले जाईल असे प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केले.
सामान्य कुटूंबातील उच्चशिक्षित युवकांना नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या वतीने कपिल ढोके यांनी अध्यक्षांचे आभार व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रदेश संघटक अनिरूध्द करपे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष दिपक खंडागळे, किरण काकडे यांनी प्रचंड मेहनत घेतली.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
___________