सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मागासवर्गीय विदयार्थ्यासाठी मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्जांची अंतीम दिनांक 26 जानेवारी 2021समाज कल्याण आधि कारी मडावी यांचे आव्हान...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, बीड मार्फत मागासवर्गीय विदयार्थ्यासाठी मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मागासवर्गीय विदयार्थ्यासाठी मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्जांची अंतीम दिनांक 26 जानेवारी 2021समाज कल्याण आधि कारी मडावी यांचे आव्हान...
(जि.मा.का) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, बीड मार्फत मागासवर्गीय विदयार्थ्यासाठी मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजनेमध्ये साविञीबाई शिष्यवृत्ती योजना, अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क माफी योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना या इयत्ता 1 ली ते 10 वी मधील योजनांचा समावेश होतो.
कोवीड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन शिथील झाल्यानंतर राज्यातील शाळा, शिक्षण टप्या टप्याने सुरू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा -1897 व आपत्ती व्यावस्थापन कायदा-2002 अंर्तगत दिनांक 15 जून 2020 च्या शासन परिपञकान्वये मार्गदर्शक सुचना विहीत केलेल्या आहेत. त्यामध्ये शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना घरात किंवा ऑनलाईन ,डिजिटल किंवा ऑफलाईन पध्दतीने शिक्षणाचे नियोजन करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत, त्यामध्ये विद्यार्थ्याची प्रत्यक्षातील उपस्थिती शिथील करण्यात आलेली आहे. तसेच सदर विद्यार्थ्याचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने स्वीकारून योजनेचा लाभ आधार सलंग्नित बॅक खात्यावर ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. महाडीबीटी योजना कार्यान्वित होईपर्यत सदर योजनेचा लाभ ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे.
जिल्हातील सर्व प्राथमिक, माध्यामिक विद्यालयातील सर्व मुख्याध्यापक यांनी साविञीबाई शिष्यवृत्ती योजना,अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क माफी योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजनाचे प्रस्ताव स्विकारून, पाञ व अपाञ ठरवुन विहीत प्रपञातील माहितीसह जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, बीड कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याची अंतीम तारिख हि 26 जानेवारी 2021 असून या नंतर कोणतेही प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. प्रस्तावाचा विहीत नमुना, सोबत जोडावयाची प्रमाणपञे यांचे नमुने कार्यालयातील फलकावर डकविण्यात आले आहेत, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी डॉ.सचिन मडावी यांनी केले आहे.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
___________