तारीख ठरली !! राममंदिर भूमी पूजनासाठी पंतप्रधान मोदीही अयोध्येला जाणार.....

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी ५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आले आहे.

तारीख ठरली !! राममंदिर भूमी पूजनासाठी पंतप्रधान मोदीही अयोध्येला जाणार.....
पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार अयोध्या...

राममंदिर भूमी पूजनासाठी पंतप्रधान मोदीही अयोध्येला जाणार....

अयोध्या राम मंदीर : अखेर अयोध्येतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राम मंदिर भूमी पूजनाची तारीख निश्चित झालीय. येत्या ५ ऑगस्ट रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या भूमिपूजनाला हजेरी लावणार आहेत.
    
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी ५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान कार्यालयाला ३ आणि ५ ऑगस्ट अशा दोन तारखा पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैंकी पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: राम मंदिराच्या भूमी पूजनात सहभागी होणार आहेत.