राज्यव्यापी अनुदानित वस्तीगृह कर्मचारी बैठकीचे आयोजन --- सचिन रणखांबे...

महाराष्ट्रातील सर्व अनुदानित वसतीगृह कर्मचारी बांधवांना वेतनश्रेणीची सुवर्णसंधी या संधीचा पुरेपुर फायदा महाराष्ट्रातील तमाम वसतीगृह कर्मचारी बंधू-भगिनींनी घ्यावा व सर्वांच्या विचाराने वेतन श्रेणी विषयक मार्गदर्शन व पाठपुरावा करण्यासाठी निश्चीत मार्गाच्या अवलंबनासाठी वरिष्ठ पदाधिकारी यांनी सहकार्य करावे व दि.१२ डिसेंबर २०२० रोजी १२.०० वाजता वेतनश्रेणीच्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे. सचिन रणखांबे यांनी आवाहन केले आहे.

राज्यव्यापी अनुदानित वस्तीगृह कर्मचारी बैठकीचे आयोजन --- सचिन रणखांबे...
Organizing Statewide Subsidized Hostel Staff Meeting --- Sachin Rankhambe ...

राज्यव्यापी अनुदानित वस्तीगृह कर्मचारी बैठकीचे आयोजन --- सचिन रणखांबे...

महाराष्ट्रातील सर्व अनुदानित वसतीगृह कर्मचारी बांधवांना वेतनश्रेणीची सुवर्णसंधी या संधीचा पुरेपुर फायदा महाराष्ट्रातील तमाम वसतीगृह कर्मचारी बंधू-भगिनींनी घ्यावा व सर्वांच्या विचाराने वेतन श्रेणी विषयक मार्गदर्शन व पाठपुरावा करण्यासाठी निश्चीत मार्गाच्या अवलंबनासाठी वरिष्ठ पदाधिकारी यांनी सहकार्य करावे व दि.१२ डिसेंबर २०२० रोजी १२.०० वाजता वेतनश्रेणीच्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे. सचिन रणखांबे यांनी आवाहन केले आहे.

बीड जिल्हा अनुदानित वसतीगृह कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जुने-नवीन पदाधिकारी व वसतीगृह कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने वरील तारखेस मागासवर्गीय मुलाचे वसतीगृह सावतामाळी चौक, फुलाई नगर, मुनोत नेत्रालया समोर बीड या ठिकाणी वरील तारखेस व वेळेत वेतनश्रेणी विषयक अखेरचा पर्याय निवडण्यासाठी राज्यातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी बैठकीस हजेरी लावणे अनिवार्य आहे.

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मा.धनंजय मुंडे यांनी नागरगोजे देवा यांना वेतनश्रेणीविषयक दिलेला शब्दाच्या अनुषंगाने सदर बैठकीत फक्त आणि फक्त वेतनश्रेणीविषयी एकमेव चर्चा होईल व योग्य मार्गाचा अवलंब केला जाईल. राज्यातील कोणी बीड जिल्हा संघटनेच्या विचारधारेशी विरोधात असतील तर त्यांच्या भावनेचा विचार करुन, मान-सन्मान करुन युवा कर्तबगार सहकारी बांधवांना या बैठकीत नेतृत्व प्रदान करण्यात येईल तरी सर्व महाराष्ट्रातील वसतीगृह कर्मचारी बंधू-भगिनींनी या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून वेतनश्रेणीचे ध्येय, धोरण ठरविण्यासाठी सहकार्य करावे ही कळकळीची विनंती केली आहे.

तरी सदर विचार विनिमयाच्या व दिशानिर्देशाच्या बैठकीसाठी खालील मान्यवरांना विशेष मार्गदर्शक अतिथी म्हणून आग्रहाचे आमंत्रण देण्यात येत आहे. एकनाथ कांबळे  (लातूर), सतिश गोटमुखले  (नांदेड), दत्ता पाटील (सोलापूर), सुंदरदास कांबळे (अहमदनगर), मारोती कांबळे  (लातूर), अशोक ठाकर  (पुणे), शेख अय्युब सर(लातूर), मिनाताई पिचड (पुणे) नागसेनपवार,औरंगाबाद पंकज गायकवाड , गव्हाणे उगले
जळगाव हिरालाल चव्हाण राठोड सावंत शरद पवार संजय शिरसाट ठाणे शंकर डोंगरे झुंजारराव संग्रामपुर कर जालिंदर अभिवांत अमर पाऊसबापु धिगे धुळे विकास पाटील शिरसाट अण्णा सरोदे बांगर आबासाहेब जाधव, कैलास पैलमाहले नंदुरबार सुहास कुलकर्णी हरीश सोमवंशी योगेश रत्नागिरी बागडी देसाई मॅडम, जुवेकर पालघर, चुनीलाल पवार सतीश सूर्यवंशी अशोक बागल सदरील पत्रामध्ये नावे नसतील.

अशा सर्व कर्मचारी बांधवांनी नाराजींचा सुर न आवळता बैठकीस उपस्थित राहून आपली विचारश्रेणी नमूद करावी याची सर्वांनी नोंद घ्यावी व बैठकीस उपस्थित राहावे ही माहिती प्रत्येकाने आपल्याकर्मचारी बांधवांना मोबाईलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वार द्यावी ही विनंती.

वरील बैठकीचे मार्गदर्शक म्हणून आमंत्रित विशेष अतिथीपैकी सर्वांनी उपस्थित राहावे व अनुपस्थित राहिल्यास त्याचा योग्य तो मॅसेज सर्व महाराष्ट्रभर पसरेल याची नोंद घ्यावी. बैठकीचे ठळक मुद्दे
सर्व समावेशक बैठकीमध्ये वेतनश्रेणी मिळविण्यासाठी काय निश्चीत मार्ग अवलंबिता येईल यावर चर्चा करणे ,जुन्या नव्या पदाधिकार्यांची कोअर कमिटी तयार करुन शासनाकडे आपली वेतनश्रेणीची मागणी मांडणे मंत्रालय आणि सचिव लेवलला काम पाहण्यासाठी पंचकमिटी स्थापन करणे. आपणा सर्वाच्या सहकार्याने बैठकीत येणारे ऐनवेळीच्या विषयांना चर्चा करुन मंजुरी देणे. या बैठक बीड जिल्ह्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक किसनदेवा नागरगोजे  यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होनार आहे.

तरी या बैठकीला राज्यातील जास्तीत जास्त अनुदानित वस्तीग्रह कर्मचारी उपस्थित राहावे असे आवाहन सारुख, जगतकर, साबळे, घुले आदींनी केले आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________