वसई विरार शहर महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर सफाई कामगारांचे आमरण उपोषण सुरू...

वसई विरार महानगर पालिकेतील सफाई कामगारांच्या मुद्यावर लाल बावट्याने गेल्या काही महिन्यांपासून अनेक आंदोलने केली. शेकडो पत्र व्यवहार करून कामगार आयुक्तांकडे देखील न्याय मागितला.

वसई विरार शहर महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर सफाई कामगारांचे आमरण उपोषण सुरू...

वसई विरार महानगर पालिकेतील सफाई कामगारांच्या मुद्यावर लाल बावट्याने गेल्या काही महिन्यांपासून अनेक आंदोलने केली. शेकडो पत्र व्यवहार करून कामगार आयुक्तांकडे देखील न्याय मागितला. परंतु आजपर्यंत कामगारांना न्याय मिळालेला नसल्याने त्यांनी आजपासून आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला असून दुपारी १२ वाजल्यापासून वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाला बसण्याआधी विरार पश्चिम येथील पुष्पानगर बस डेपो येथून मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्य शेकडोंच्या संख्येने सफाई कामगार सहभागी झाले होते.

या उपोषणाला अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे जिल्हा संघटक शेरु वाघ, विमल खाणे, निर्मला चौधरी व इतर कामगार बसले आहेत. कोरोना टाळेबंदीच्या काळात सुमारे १७५ हून अधिक सफाई कामगारांना कोणतीही नोटीस न देता तडकाफडकी कामावरून काढण्यात आले. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कामावरून कामगारांना काढणे बेकायदेशीर असल्याने त्यांना कामावर रूजू करून घ्यावे. या मागणीसाठी आज उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही , तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा युनियनचे जिल्हा संघटक शेरू वाघ यांनी दिला आहे.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

___________