पिंपरी चिंचवड मध्ये आज एकही कोरोनामृत्यू नाही…
पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) रोजी १४६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये आज एकही कोरोनामृत्यू नाही…
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२०) : पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) रोजी १४६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील परंतु पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात मृत्यू झालेले दोन पुरुष रुग्ण हे जुन्नरमधील ६७ वर्षे व ६७ वर्षे येथील रहिवाशी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८७७४० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८४४७८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५२७ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही
लोहगाव , पुणे
प्रतिनिधी - आत्माराम काळे
__________