कोरोना पॉसिटीव्ह ऐश्वर्या राय , आराध्या देखील नानावटी रुग्णालयात....

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कोरोना पॉसिटीव्ह ऐश्वर्या राय , आराध्या देखील नानावटी रुग्णालयात....

कोरोना पॉसिटीव्ह ऐश्वर्या राय , आराध्या देखील नानावटी रुग्णालयात....

मुंबई, 17 जुलै : कोरोना पॉझिटिव्ह अभिनेते अमिताभ बच्चन ,अभिषेक बच्चन  यांच्यानंतर आता अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

ऐश्वर्या रायमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. तिला हलका ताप आला आहे. त्यानंतर ऐश्वर्यासह आराध्यालाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं. तर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर आधीपासूनच नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.