महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट?

हा आकडा येत्या एक दोन दिवसात 10 हजाराच्या घरात पोहोचण्याची भीती व्यक्त केली जातेय. 7 हजार 431 रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेत.

महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट?
corona third wave

महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट?

हा आकडा येत्या एक दोन दिवसात 10 हजाराच्या घरात पोहोचण्याची भीती व्यक्त केली जातेय.7 हजार 431 रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेत.

देशातला कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा झपाट्यानं वाढतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही कोरोनाच्या केसेसमध्ये अचानक वाढ होताना दिसतेय. आपल्या राज्यात गेल्या चोवीस तासात पीआयबीच्या माहितीनुसार 6 हजार 600 नव्या रुग्णांची भर पडलीय तर देशात हा आकडा 41 हजार 49 एवढा आहे. त्यातही 41 हजार रुग्णांपैकी एकट्या केरळच्या रुग्णांची संख्या ही निम्म्यावर आहे.बारामती, लातूर, बीड अशा ठिकाणी कोरोनाचा प्रार्दुर्भाव कमी होण्याऐवजी तो वाढतानाच दिसतोय.(Corona Third Wave)

विशेष म्हणजे महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात साडे सहा हजारापेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काही रिपोर्टनुसार तर हा आकडा येत्या एक दोन दिवसात 10 हजाराच्या घरात पोहोचण्याची भीती व्यक्त केली जातेय. शेवटच्या हाती आलेल्या माहितीनुसार 7 हजार 431 रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेत. तर 231 जणांना मात्र जीव गमवावा लागलाय. सध्यस्थितीत महाराष्ट्रात सक्रियरुग्णांचा आकडा हा 77 हजार 494 एवढा आहे.

केरळ सरकारच्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात तिथं कोरोनाच्या 20 हजार 772 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 116
रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात ज्या नव्या केसेस सापडतायत त्यात एकट्या केरळचा वाटा हा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
केरळमध्ये 13.61 एवढा संक्रमनाचा दर आहे. बकरी ईदला केरळ सरकारनं मोठी सुट दिली आणि त्याचाच परिणाम
म्हणून कोरोनाचा स्फोट झाल्याचा आरोपही केला जातोय.

पण कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पहाता, तिथल्या सरकारनं शनिवार, रविवार असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केलीय.गेल्या चार दिवसांपासून देशात रोज कोरोनाचे 40 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडतायत. गेल्या चोवीस तासात 41 हजार 649 एवढे नवे रुग्ण सापडलेत. शुक्रवारी हाच आकडा 44 हजार 230 एवढा होता. दिलासादायक म्हणजे अजूनही रिकव्हरी
रेट हा 97 टक्क्यापेक्षा जास्त आहे.(Corona Third Wave)

गेल्या चोवीस तासात 37 हजार 291 रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालेत.