कोरोनानं घरातील 3 सदस्य हिरावले तरीही रुग्णांची सेवा करत ही महिला डॉक्टर

कोरोनानं डॉक्टर स्वप्ना यांची आई, वडील आणि भाऊ त्यांच्याकडून हिरावले. मात्र, तरीही स्वप्ना यांनी आपलं काम न सोडता त्या कोरोना रुग्णांवर उपचार करत राहिल्या.

कोरोनानं घरातील 3 सदस्य हिरावले तरीही रुग्णांची सेवा करत  ही महिला डॉक्टर
corona update

कोरोनानं घरातील 3 सदस्य हिरावले तरीही रुग्णांची सेवा करत  ही महिला डॉक्टर

female doctor who serves patients, losing 3 members of the household

कोरोनानं डॉक्टर स्वप्ना यांची आई, वडील आणि भाऊ त्यांच्याकडून हिरावले. मात्र, तरीही स्वप्ना यांनी आपलं काम न सोडता त्या कोरोना रुग्णांवर  उपचार करत राहिल्या.

कोरोनाच्या काळात  अनेकांनी आपली जवळची लोकं गमावली. हा काळ सर्वांसाठी अत्यंत कठीण आहे. मात्र, या परिस्थितीमध्येदेखील डॉक्टर  आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांच्या उपचारासाठी दिवसरात्र काम करत आहेत. अशीच आणखी एक महिला डॉक्टर आहे.

जिची कथा अंगावर काटा आणणारी आहे. ही गोष्ट आहे डॉक्टर स्वप्ना यांची. कोरोनानं डॉक्टर स्वप्ना यांची आई, वडील आणि भाऊ त्यांच्याकडून हिरावले. मात्र, तरीही स्वप्ना यांनी आपलं काम न सोडता त्या कोरोना रुग्णांवर उपचार करत राहिल्या. याच कारणामुळे त्या आपल्या कुटुंबीयातील सदस्यांना अखेरचा निरोप देण्यासाठीही पोहोचल्या नाहीत. त्यांचे पतीही डॉक्टर असून कोरोना रुग्णांवर उपचार करतात.

मुळच्या बिहारच्या मुझफ्फरपूर येथील रहिवासी असलेल्या डॉक्टर स्वप्ना आपल्या पती आणि दोन मुलांसोबत राहातात. त्या स्त्रीरोगतज्ञ आहेत. अशात त्यांच्यावर कोरोनाबाधित महिलांची प्रसूती आणि त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात डॉक्टर स्वप्ना यांच्या वडिलांचं निधन झालं. ते रुग्णांवर उपचार करत होते.

कुटुंबीयांनी सांगितलं, की अधिक वय असल्यानं कोरोना काळात रुग्णांवर उपचार करण्यास त्यांना नकार दिला होता. मात्र, या कठीण काळात आपण रुग्णांवर उपचार करणार असल्याच्या निर्णयावर ते ठाम होते. याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाली.

आठ दिवसांपूर्वीच त्यांच्या कोरोनाबाधित आईचंही निधन झालं. त्यांच्या आईला मुझफ्फरपूरमधील कोणत्याही रुग्णालयात बेड मिळाला नाही. त्यांच्या शरिरात ऑक्सिजन प्रचंड कमी झाला होता. प्रकृती गंभीर असल्यानं त्यांचा जीव वाचवणं शक्य झालं नाही.

स्वप्ना यांचा 39 वर्षाचा भाऊ आयटी कंपनीत एचआर होता. सात दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना पाटणाच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी रात्री एक वाजता त्यांचा मृत्यू झाला.

 त्यांच्या घरात केवळ एक भाऊ आणि त्याचं कुटुंब आहे. लहान भाऊच आई आणि भावाला उपचारासाठी दाखल करण्यासाठी धावपळ करत होता. स्वप्ना यांना कुटुंबीयांसहीत क्वारंटाईन केलं आहे. त्यांनी सांगितलं, की या महामारीदरम्यान रुग्णांवर उपचार करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. केवळ काळजी मुलांची वाटते.

आणि त्यांचा पती दोघंही कोरोना ड्यूटीवर आहेत. मात्र, या काळातही न हारता त्या कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत.