चीनच्या राजदूताने दिली प्रतिक्रिया

सोनू सूद सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अलीकडेच त्यांनी ट्विट करून चीनची चांगलीच शाळा घेतली होती. चीनमुळे भारतातील लोकांचे नुकसान होत असल्याचे त्याने म्हटले होते.

चीनच्या राजदूताने दिली प्रतिक्रिया
Corona Death

चीनच्या राजदूताने दिली प्रतिक्रिया

Chinese Ambassador responds

सोनू सूद सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अलीकडेच त्यांनी ट्विट करून चीनची चांगलीच शाळा घेतली होती. चीनमुळे भारतातील लोकांचे नुकसान होत असल्याचे त्याने म्हटले होते.

लॉकडाऊनमध्ये ‘मसीहा’ म्हणून पुढे आलेल्या अभिनेता सोनू सूद याने आतापर्यंत कोट्यवधी लोकांना मदत केली आहे. गेल्या वर्षी त्याने हजारो लोकांना लॉकडाऊनदरम्यान आपआपल्या घरी जाण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्या अन्न-पाण्याची देखील व्यवस्था घेतली.

सोनू सूद अजूनही लोकांना मदत करण्यात व्यस्त आहे. तो या काळात कोणतीही मदत करण्यास मागेपुढे पाहत नाही. सोनू सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अलीकडेच त्यांनी ट्विट करून चीनची चांगलीच शाळा घेतली होती. चीनमुळे भारतातील लोकांचे नुकसान होत असल्याचे त्याने म्हटले होते. आता या प्रश्नावर चीनकडून उत्तर आले आहे 

आम्ही हजारो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. चीनने आमच्या बर्‍याच वस्तूंवर बंदी घातली हे फार वाईट आहे, ज्यामुळे भारतात प्रत्येक मिनिटाला लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आम्ही आपणास विनंती करतो की, आम्हाला ही उपकरणे आणण्यास मदत करा जेणेकरुन आम्ही लोकांचे प्राण वाचवू शकू.

सोनू सूद यांच्या या ट्विटला आता चिनी राजदूताने प्रत्युत्तर दिले आहे. त्याने ट्विट केले की, ‘सोनू सूद मी तुमची माहिती लक्षात घेत आहे. कोरोना काळामध्ये भारताला मदत करण्यासाठी चीन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.’ चीनी राजदूताच्या या ट्विटला सोनू सूद यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. त्याने लिहिले की, ‘उत्तराबद्दल धन्यवाद, ही समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्या कार्यालयाशी संपर्क साधत आहे.

अभिनेता सोनू सूद यांनी अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कोरोना साथीच्या आजारात आपले पालक गमावलेल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला विशेष विनंती केली गेली आहे. व्हिदिओ सोशल मीडियावर शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘या कोरोना साथीच्या काळात ज्यांनी आपले जवळचे लोक गमावले आहेत, अशा लोकांना आपण सर्वांनी एकत्र यायला मदत केली पाहिजे.’

अलीकडेच सोनू सूदला कोरोनाची लागण झाली होती. त्याने एका आठवड्यातच कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्याने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर एका आठवड्यानंतर पुन्हा एकदा त्याने ट्विट करत आपण कोरोना निगेटिव्ह झाल्याची बातमी दिली आहे.

कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा काम सुरू केले आहे. दिवस रात्र तो लोकांना मदत करण्यात व्यस्त आहे.