दोन दिवसांपूर्वी असलेली ३५० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी वाढून ती ५००

धावपळ थांबवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १० तर खासगी कंपन्यांमार्फत १७ ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात येणार आहे.

दोन दिवसांपूर्वी असलेली ३५० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी वाढून ती ५००
covid 19 update

दोन दिवसांपूर्वी असलेली ३५० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी वाढून ती ५०० 

Demand for oxygen increased from 350 metric tonnes two days ago to 500 metric tonnes

धावपळ थांबवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १० तर खासगी कंपन्यांमार्फत १७ ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात येणार आहे. 

जिल्ह्याची ऑक्सिजची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी असलेली ३५० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी वाढून ती ५०० च्या जवळपास पोहचली आहे. मात्र, ही तूट कायम असल्याने ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत आहे. ही धावपळ थांबवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १० तर खासगी कंपन्यांमार्फत १७ ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात येणार आहे. यामुळे ऑक्सिजनची तूट लवकरच भरून निघणार आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा नियमित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व प्रशासन संचालकमार्फत समिती स्थापन करण्यात आली.

ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी मुंबई, ठाणे, मुरबाड, जामनगर येथून ऑक्सिजन टँकरद्वारे पुण्यात आणून येथील ऑक्सिजन टंचाई दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ही तूट भरून निघत नव्हती. रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्याच्या ऑक्सिजनच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

सध्या शंभर टक्के निर्माण होणारा ऑक्सिजन आरोग्यासाठी खर्च केला जात असला, तरी ऑक्सिजन कमीच पडत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीन पाऊल उचलले असून, आता जिल्हा नियोजन समितीमधून जिल्ह्यात दहा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे पाच ते सहा कोटींच्या प्रशासकीय कामांना मान्यता देण्यात आली आहे.

या सोबतच काही खासगी कंपन्या सामाजिक दातृत्वातून जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पांची कामेही सुरू करण्यात आली आहे. येत्या १० ते १५ दिवसांत या प्रकल्पांची कामे पूर्ण होऊन ते कार्यान्वित केले जाणार आहे

जिल्ह्यात खासगी कंपन्यांमार्फत उभ्या करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाची क्षमता दर मिनिटाला ही ६०० ते ७०० लिटर एवढी आहे. जवळपास १०० ऑक्सिजन खाटांना हा पुरवठा केला जाऊ शकतो. प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रावर हे प्रकल्प उभे केले जाणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या दहा ऑक्सिजन प्रकल्प हेे ग्रामीण रुग्णालय व उपरुग्णालयात उभे राहणार आहेत. तर खासगी कंपन्यांमार्फत आंबेगाव तालुक्यातील मंचर, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, खेड तालुक्यातील चांडोली, मावळ तालुक्यातील कान्हे, दौंड तालुक्यातील यवत, खेड तालुक्यातील आळंदी, मुळशी तालुक्यातील पाैड, पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी, आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव.

इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहर, भोर एसडीएच, मावळमधील काळे कॉलनीतील आरएच, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर आणि शिरूर शहरात उभारण्यात येणार आहे.