ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात ही करिअर करावे

जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रामपुरी येथे आज इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात ही करिअर करावे
covid vaccination camp

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात ही करिअर करावे

जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रामपुरी येथे आज  इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. 

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रामपुरी येथे आज  इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री.रणवीर राजे पंडित यांच्या शुभ हस्ते  उदघाटन सोहळा  सकाळी 11.00 वाजता संपन्न झाला. अध्यक्षीय भाषणात रणवीर राजे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबर स्पोर्ट्स मध्ये  प्रगती करुन आपलं टॅलेंट जगाला दाखवलं पाहिजे, नाव उज्वल केले पाहिजे, स्पोर्ट मध्ये करिअर करण्यासाठी खूप मोठ्या संधी आहेत.(covid vaccination camp)

  शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात मुलांना योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे . आपण पुढें या आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत असे आश्वासन देऊन विश्वास दिला.मार्गदर्शन करताना त्यांनी असे म्हटले की आपल्या घरातील आई ,वडील ,काका, काकी, भाऊ-बहीण सगळ्या परिवाराने स्व: ईच्छेने लसीकरण करून या  मोहिमेला प्रतिसाद द्यावा ,व आपली शाळा, गाव, तालुका,  जिल्हा व आपला देश कोरोना मुक्त होण्यासाठी मदत करावी.


प्रास्ताविक भाषणात श्री अशोक तौर यांनी लस घेणे किती  महत्वाचे आहे हे उदाहरण देऊन स्पष्ट केले.या कोविड महामारीतून  वाचायचे असेल तर कोविड 19 चे नियम पाळणे अतिशय महत्वाचे आहे असे मोलाचे मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन सौ पल्लवी झोडगे वैद्यकिय अधिकारी, तसेच श्री प्रदीप दादा मस्के, राष्ट्रवादी किसन सेलचे तालुकाध्यक्ष सुभाष दादा मस्के , राष्ट्रवादी युवा नेते महादेव आंभुरे, कैलास सरक उपस्थित होते.


 लसीकरण मोहीम उत्साहात पार पाडण्यासाठी जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर चाळक, डॉक्टर मुंडे, डॉक्टर राठोड,वखरे सिस्टर ,तसेच रामपूरी येथील आशा सेविका उनवणे , बनसोडे,  शाळेतील सर्व शिक्षकवृंद व प्राध्यापक, आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव एल.जी सर , तर  आभार   सुधाकर देशमुख सर यांनी मानले.(covid vaccination camp)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/