शहापूर तहसीलदार कार्यालयात कोविड- १९ कॉलसेंटर सुरु करण्याची भरत उबाळे यांची मागणी 

शहापूर तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण व प्रादुर्भाव वाढू लागला आहे. म्हणून कोरोना संबंधात दुरध्वनीवरुन संपर्क साधून मदत व मार्गदर्शन मिळविणे सोयीचे व्हावे याकरीता शहापूर तहसीलदार कार्यालयात कोविड - १९ कॉलसेंटर सुरु करण्याची मागणी विधायक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत उबाळे यांनी केली आहे.

शहापूर तहसीलदार कार्यालयात कोविड- १९ कॉलसेंटर सुरु करण्याची भरत उबाळे यांची मागणी 
covid19 call center

शहापूर प्रतिनिधी शेखर पवार:

 शहापूर तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण व प्रादुर्भाव वाढू लागला आहे. म्हणून कोरोना संबंधात दुरध्वनीवरुन संपर्क साधून मदत व मार्गदर्शन मिळविणे सोयीचे व्हावे याकरीता शहापूर तहसीलदार कार्यालयात कोविड - १९ कॉलसेंटर सुरु करण्याची मागणी विधायक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत उबाळे यांनी केली आहे. त्यांनी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांना गुरुवारी पत्र पाठवून कळविले आहे.(covid19 call center)

सध्याच्या परिस्थितीमध्ये करोनाचा प्रादूर्भाव सर्वत्र वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहापूर तहसीलदार कार्यालयामध्ये कोविड- १९ कॉल सेंटर सुरू करण्याची गरज भरत उबाळे पत्राद्वारे मांडली आहे. तहसीलदार कार्यालयामध्ये कोविड- १९ कॉलसेंटर सुरू केल्यास दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नागरिक कोविड- १९, बेड व्यवस्थापन, ॲम्बुलन्स तसेच अन्य वैद्यकीय सुविधा याबाबतची माहिती विचारू शकतात, वैद्यकीय मदत व मार्गदर्शन मिळवू शकतात, असे भरत उबाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले असून अशा पद्धतीचे कॉलसेंटर सुरु करण्याची मागणी केली आहे.(covid19 call center)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/