पीकविम्याच्या माध्यमातुन अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळुन द्या - चेतनसिंह पवार

जिल्हाधिकारी ठाणे ह्यांना मागील तीन दिवसापुर्वी अवकाळी पाऊस दोन दिवस मोठ्याप्रमाणात झाला त्यामुळे शेतात कापलेल्या भात तसेच उभे असलेला भात यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पीकविम्याच्या माध्यमातुन अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळुन द्या - चेतनसिंह पवार
crop insurance

सोमवार दि.८ नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी ठाणे ह्यांना मागील तीन दिवसापुर्वी अवकाळी पाऊस दोन दिवस मोठ्याप्रमाणात झाला त्यामुळे शेतात कापलेल्या भात तसेच उभे असलेला भात यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यासंर्दभात मुरबाड तहसिलदार यांच्या मार्फत कॅांग्रेसचे तालुकाध्यक्ष  चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.(crop insurance)

यावेळी सेवादलचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे, महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संध्या कदम,  युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, जिल्हासरचिटणीस उमेश चौधरी, राहुलजी गांधी विचारमंचचे तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, तालुकाउपाध्यक्ष नेताजी लाटे, तालुका संघटक गुरूनाथ देशमुख, अमोल चोरघे, हरेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. कापणी पश्चात १४ दिवसापर्यंत जर कोणतेही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर पीकविमा २०२०-२१ च्या नियमानुसार सबकलम ४ अन्वये नुकसान झालेले ७२ तासामध्ये कळवल्यास ते शेतकरी भरपाईसाठी पात्र असतात असे प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केले.

कापणी करुन झोडणी न करता साठवून ठेवलेल्या पिकामध्ये देखील पाणी साठल्यामुळे त्यांना देखील मोड आले आहेत तरीही आपण आपल्या विभागाच्या वतीने अथवा पिक विमा कंपनीच्या माध्यमातुन पंचनामे करुन संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करावी अशा विंनती नरेश मोरे यांनी केली तर अल्पभूधारक शेतकरी जे विम्यासाठी पात्र होत नाही त्यांना शासनाच्या नुकसानभरपाई मध्ये बसवावे असे मत उमेश चौधरी यांनी व्यक्त केले.(crop insurance)