पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधी कडे शेतकऱ्यांनी ओळखपत्राची विचारणा केली असता शेतकऱ्यांना अरेरावी

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरात अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधी कडून शेतकऱ्यांनची आर्थिक पिळवणूक होत आहे .तसेच ओळखपत्र सोबत नसताना पंचनामे करत आहेत.

पीकविमा कंपनीच्या  प्रतिनिधी कडे शेतकऱ्यांनी ओळखपत्राची विचारणा केली असता शेतकऱ्यांना अरेरावी
crop insurance company

पीकविमा कंपनीच्या  प्रतिनिधी कडे शेतकऱ्यांनी ओळखपत्राची विचारणा केली असता शेतकऱ्यांना अरेरावी

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरात अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधी कडून शेतकऱ्यांनची आर्थिक पिळवणूक होत आहे .तसेच ओळखपत्र सोबत नसताना पंचनामे करत आहेत.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

खरच अग्रीकल्चर इन्शुरन्स पीक विमा कंपनी कडूनच पंचनामे होत आहेत का ?गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरात अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधी कडून शेतकऱ्यांनची आर्थिक पिळवणूक होत आहे .तसेच ओळखपत्र सोबत नसताना पंचनामे करत आहेत.सविस्तर असे की सिरसदेवी येथील शेतकऱ्यांनी अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी कडून पीक विमा काढला आहे त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून सिरसदेवी मध्ये शेतकऱ्यांचा पंचनामा करण्यासाठी वेगवेगळे प्रतिनिधी पीक विमा कंपनी पाठवत आहे.(crop insurance company)

तसेच त्यांच्या कुठल्याही प्रतिनिधी कडे ओळखपत्र नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अविश्वास निर्माण झाला आहे. पंचनामा करण्यासाठी आलेला प्रतिनिधी हा अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपणीचाच आहे का हे कशावरून शेतकरी ओळखणार असा प्रश्न शेतकऱ्यांनच्या मध्ये उपस्थित होत आहे.

 सिरसदेवी परिसरात अनेक प्रतिनिधीनि वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाची पाहणी करून पंचनामा केला आहे. परंतु दोन दिवसाला पीकविमा कंपनी वेगळा प्रतिनिधी पाठवत असेल व त्याच्याकडे पिक विमा कंपनी चे ओळखपत्र नसल्यामुळे खरच आमचा पंचनामा पीक विमा कंपनी ने केला आहे का आम्हाला विमाचे अनुदान मिळेल का नाही याची जबाबदारी कोण देणार असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे.

त्यामुळे आज दिनांक २५/०९/२०२१ शनिवार रोजी सिरसदेवी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात विना ओळखपत्र नसलेले दोन प्रतिनिधी आले होते त्यानं काही शेतकऱ्यांनि विचारले तुमच्याकडे ओळखपत्र विमा कंपनीचे आहे का नाही त्यांनी शेतकऱ्यांना अरेरावी ची भाषा केली व आम्ही दोन दिवस झाले कामावर रुजू झालो आहोत असे उत्तर शेतकऱ्यांना दिले त्यामुळे थिते असलेले ऍड उमेश वेताळ यांनी विचारणा केली असता त्यांनाही अरेरावी केली त्यामुळे हे अग्रीकल्चर इन्शुरन्स  पीक विमा कंपणीचेच आहेत का हे कशावरून गृहीत धरले पाहिजे त्यामुळे वीमा कंपनी कडून खरच पंचनामे होत आहेत  हेही कशावरून सिद्ध होत आहे.


  त्यामुळे पीक विमा कंपनी ने पंचनामा करण्यासाठी पाठवलेल्या प्रतिनिधी सोबत ओळखपत्र असेल तरच पठवावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतुन होत आहे. तसेच अरेरावी करणाऱ्या प्रतिनिधी वर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.यावेळी उमेश वेताळ यांची घेतलेली प्रतिक्रिया.(crop insurance company)