जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा मिळण्यास दिरंगाई, शेतकरी संतापले, कांद्रेभुरे येथील शेतकरी 2020 पासून विमा पासून वंचित

पालघर तालुक्यातील कांद्रेभुरे येथील शेतकऱ्यांचा गेल्यावर्षी 14 ऑक्टोंबर रोजी अवकाळी पावसाने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. पिक विमा कंपनीला 72 तसेच आत ऑनलाइन सर्वे करून कळवण्यात आले होते.

जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा मिळण्यास दिरंगाई, शेतकरी संतापले, कांद्रेभुरे येथील शेतकरी 2020 पासून विमा पासून वंचित
crop insurance company

जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा मिळण्यास दिरंगाई, शेतकरी संतापले, कांद्रेभुरे येथील शेतकरी 2020 पासून विमा पासून वंचित

 पालघर तालुक्यातील कांद्रेभुरे येथील शेतकऱ्यांचा गेल्यावर्षी 14 ऑक्टोंबर रोजी अवकाळी पावसाने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. पिक विमा कंपनीला 72 तसेच आत ऑनलाइन सर्वे करून कळवण्यात आले होते.

रविंद्र घरत पालघर:

पालघर तालुक्यातील कांद्रेभुरे येथील शेतकऱ्यांचा गेल्यावर्षी 14 ऑक्टोंबर रोजी अवकाळी पावसाने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. पिक विमा कंपनीला 72 तसेच आत ऑनलाइन सर्वे करून कळवण्यात आले होते.मात्र 100 टक्के नुकसान होऊन अजून पर्यंत शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. त्यामुळे कांद्रेभुरे येथील शेतकरी गेल्या वर्षभरापासून शेतकरी वंचित आहेत.(crop insurance company)

संकटकाळी पीकविमा फायद्याचा ठरत नसल्याची ओरड पालघर  मधील  शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. पीकविमा मिळविण्यासाठी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विविध अटी व नियमांचा अडथळा निर्माण केल्या जातो. त्यामुळे विमा मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे शेतकरीवर्गाकडून सांगितले जात आहे.

पालघर जिल्ह्यात भात पिकांना संरक्षित करण्यासाठी शेतकरी वर्ग पीकविमा उतरवित असतो. हा पीकविमा शेतकरी वर्ग स्वेच्छेने काढत असतो. मात्र, काढलेला पीकविमा संकटकाळी फायद्याचा ठरत नसल्याची ओरड शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. पीकविमा मिळविण्यासाठी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विविध अटी व नियमांचा अडथळा निर्माण केला जातो. त्यामुळे विमा मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे.


पालघर जिल्ह्यातील शेतकरीनैसर्गिक आपत्तीत शेतकरी वर्गाचा खरीप आणि रब्बी हंगामात पिकांचा विमा उतरविला जातो. यात खरीप हंगामातील भात पिकांचा विमा सेवा सहकारी संस्था बँकेच्या माध्यमातून खाजगी पिकविमा कंपन्यांकडून उतरविला जातो. सक्तीचा पीकविमा नसल्याने काही शेतकरीवर्गाकडून पीकविमा उतरविला जात नाही. मात्र, जे शेतकरी दरवर्षी पीकविमा उतरविताता त्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात विमा कंपन्यांकडून विमा मिळत नाही. विमा देण्यात कंपन्यांकडून दिरंगाई केली जाते, अशी तक्रार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पालघर जिल्हात गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत बाधित शेतकऱ्यांमध्ये पीकविमा उतरविलेले आणि अर्ज प्राप्त झालेल्या शेतकरीवर्गाची यादी कमी होती.   या पुढे पंचनामे वाढतील तसे क्षेत्र आणि शेतकरी संख्या वाढेल, अशी कृषी कार्यालयाकडून माहिती देण्यात आली होती. फळपिके असोत किंवा भात पिके, त्यांच्या सुरक्षिततेसाठी विमा हा नैसर्गिक आपत्तीत शेतकरी वर्गाला दिलासादायक ठरत असतो. मात्र, संकट काळी विमा कंपन्यांकडून पीकविमा न मिळने किंवा विमा देण्यास दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पीकविमा लवकरात लवकर देण्याची मागणी केली जात आहे.


गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे   शेतीचे व  शेतीसाठी लागणारे बरेच वस्तूंचे नुकसान झाले होते. त्याचे फार्म भरुन घेतले होते मात्र अजूनही कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई मिळाली नाही. आवश्यक तेवढी सर्व कागदपत्रे व नुकसान भरपाई फार्म भरुन घेतले होते मात्र अजूनही कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई मिळाली नाही.(crop insurance company)

जगदीश पाटील कांद्रेभुरे, शेतकरी

 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई विमा संदर्भात प्रक्रिया सुरू असून टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांना भरपाई व विमा मिळेल.

तरुण वैती,
तालुका कृषी अधिकारी

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/