वाडा तालुक्यातील जामघर गावात दिवाळीनिमित्ताने जीवनावश्यक वस्तू वाटप...

वाडा तालुक्यातील जामघर गावात दिवाळी निम्मिताने परिसरातील गरजु कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू व मास्क वाटप दि.१४ नोव्हेंबर रोजी विक्रमगड मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा,पालघर जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, गटनेते नरेश आकरे ,जिल्हा सरचिटणीस अशोक गव्हाळे यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले.

वाडा तालुक्यातील जामघर गावात दिवाळीनिमित्ताने जीवनावश्यक वस्तू वाटप...
Distribution of essential items on the occasion of Diwali in Jamghar village of Wada taluka ...

वाडा तालुक्यातील जामघर गावात दिवाळीनिमित्ताने जीवनावश्यक वस्तू वाटप...

वाडा तालुक्यातील जामघर गावात दिवाळी निम्मिताने परिसरातील गरजु कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू व मास्क वाटप दि.१४ नोव्हेंबर रोजी विक्रमगड मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा,पालघर जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, गटनेते नरेश आकरे ,जिल्हा सरचिटणीस अशोक गव्हाळे यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले.

      यावेळी उपस्थित गरजू कुटुंबाना मार्गदर्शन करताना सुनील भुसारांनी बोलत होते की,आज हा कार्यक्रम आयोजकांनी आयोजित करून खऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या समाजबाधवांना दिल्या आहेत. आज आपण सोशल मीडियावर एकमेकांना  दिवाळीच्या शुभेच्या देत असतो परतू हे सर्व दिखाऊ आहे. खरा आनंद आहे तो गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून त्याच्यांबरोबर दिवाळी साजरी करण्यात. त्याचबरोबर त्यांनी आदीवासी विकास प्रकल्प मंडळ मार्फत लवकरच खवटी अनुदान वाटप कऱण्यात येणार आहे असे यावेळी बोलताना सांगितले.  या कार्यक्रमा प्रसंगी ध्यान तज्ञ समुपदेशक दीपेश पष्टे यांनी उपस्थित नागरिकांना कोरोना संदर्भात जनजागृती करून मार्गदर्शन केले.

      सदर या कार्यक्रमाचे  आयोजन विश्वजीत गोळे, सचिन पाटील व जनसेवा सामाजीक संस्था यांच्या मार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जनसेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नरेश जाधव, खजिनदार भूषण ठाकरे,सचिव जयेश घोडविंदे,सल्लागार वैभव भोईर भोईर,मयुरी बागुल,सुरज जाधव,पुष्पा पवार व जामघर गावातील नागरिक उपस्थित होते.

वाडा

प्रतिनिधी - जयेश घोडविंदे

__________