पालघर व ठाणे जिल्ह्यातील गटसचिवांना जिल्हा बँकेकडून ८.३३ बोनस दिवाळी भेट...

पालघर व ठाणे जिल्ह्यातील १०६ गटसचिवांनी कोरोनाच्या काळात मोठ्याप्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, कर्ज वाटपाचे तसेच पीएम किसन आणि पीक विम्याची कामे वेळेत केल्यामुळे ठाणे जिल्हा बँकेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व गटसचिवांना येणारी दिवाळी गोड करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व संचालक मंडळाच्या ऑनलाइन झालेल्या बैठकीमध्ये ८.३३ टक्के बोनस, चालू पगार व मागील वर्षाची इन्क्रीमेंट अशी एकत्रित रक्कम मंजूर करून देण्याचे ठरविले आहे.

पालघर व ठाणे जिल्ह्यातील गटसचिवांना जिल्हा बँकेकडून ८.३३ बोनस दिवाळी भेट...
8.33 bonus Diwali gift from District Bank to group secretaries in Palghar and Thane districts ...
पालघर व ठाणे जिल्ह्यातील गटसचिवांना जिल्हा बँकेकडून ८.३३ बोनस दिवाळी भेट...

पालघर व ठाणे जिल्ह्यातील गटसचिवांना जिल्हा बँकेकडून ८.३३ बोनस दिवाळी भेट...

पालघर व ठाणे जिल्ह्यातील १०६ गटसचिवांनी कोरोनाच्या काळात मोठ्याप्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, कर्ज वाटपाचे तसेच पीएम किसन आणि पीक विम्याची कामे वेळेत केल्यामुळे ठाणे जिल्हा बँकेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व गटसचिवांना येणारी दिवाळी गोड करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व संचालक मंडळाच्या ऑनलाइन झालेल्या बैठकीमध्ये ८.३३ टक्के बोनस, चालू पगार व मागील वर्षाची इन्क्रीमेंट अशी एकत्रित रक्कम मंजूर करून देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यातील गतसचिवांना ही दिवाळी आनंदमय जाणार आहे.

      यासाठी ठाणे जिल्हा गटसचिव संघटनेचे अध्यक्ष अरुण आरज, कार्याध्यक्ष विठ्ठल म्हाडसे, गटसचिव कर्मचारी पतसंस्था अध्यक्ष योगेश घरत व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, व्यवस्थापक राजेंद्र दोंदे व संचालक मंडळाच्या भेट घेऊन आपल्या मागण्यासंदर्भात चर्चा केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी गटसचिवांनी वेळेत केलेल्या कामामुळे खुश होऊन बँकेकडून ८.३३ टक्के बोनस, चालू पगार व मागील इन्क्रीमेंट अशी एकूण रक्कम दिवाळीपूर्वी देण्याचे अश्वाचीत केले असून देखरेख संघाला आज गटसचिवांच्या खात्यात सदर रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

      पालघर व ठाणे जिल्ह्यातील १०६ गटसचिवांना दिवाळीपूर्वी सदर रक्कम मिळणार असल्याने ते अत्यंत समाधानी असून त्यांनी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, व्यवस्थापक राजेंद्र दोंदे व संचालक मंडळाचे व्यक्तिशः आभार मानले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असून आज गटसचिवांच्या बचत खात्यात दिवाळी बोनस व इतर रक्कम जमा होणार असल्याने पालघर व ठाणे जिल्ह्यातील गटसचिवांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांची ही दिवाळी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी गोड केली आहे. तसेच पगारवाढी संदर्भात येत्या काहि महिन्यात निर्णय घेऊन गटसचिवांना आणखीन एक दिवाळी भेट द्यावी. अशी विनंती ठाणे जिल्हा गटसचिव संघटनेचे अध्यक्ष अरुण आरज, कार्याध्यक्ष विठ्ठल म्हाडसे, पदाधिकारी व गटसचिव कर्मचारी पतसंस्था अध्यक्ष योगेश घरत यांनी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्याकडे केली असून केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

पालघर

प्रतिनिधी : राजेंद्र पाटील

___________