शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्यानंतर डॉक्टरांचे उपोषण मागे...

कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानंतर २५ तारखेपासून रुग्णालय बंद ठेवत उपोषणाला  बसण्याचा इशारा दिला होता.

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्यानंतर डॉक्टरांचे उपोषण मागे...
Doctors' fast back after Shiv Sena corporator's apology ...
शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्यानंतर डॉक्टरांचे उपोषण मागे...

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्यानंतर डॉक्टरांचे उपोषण मागे...

कल्याण : कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानंतर २५ तारखेपासून रुग्णालय बंद ठेवत उपोषणाला  बसण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नगरसेवकाने संबंधित डॉक्टरची माफी मागितल्यावर डॉक्टरांनी उपोषणाचा निर्णय  मागे घेतल्याची घोषणा केली आहे.

कल्याण पश्चिमेतील वैष्णवी रुग्णालयामध्ये शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि रुग्णालयाचे डॉक्टर अश्वीन कक्कर यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वादाचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या वादानंतर डॉक्टरांनी रुग्णालय बंद ठेवत आपल्या स्टाफसह उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र रुग्णालय बंद राहिल्यास याचा फटका रुग्णांना बसू शकतो, या जाणीवेतून नगरसेवक महेश गायकवाड यांनी माघार घेत डॉक्टरांची माफी मागितली आहे.

दोन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेला रुग्णालय प्रशासनाने दाखल करुन घेतले. रुग्णालयाच्या बाहेर महिलेच्या नातेवाईकांनी थांबू नये, अशी ताकीद देण्यात आली होती. मात्र, तरी देखील गर्भवती महिलेचे नातेवाईक घरी गेले नाहीत. त्यामुळे नातेवाईकासह गर्भवती महिलेससुद्धा डॉक्टर कक्कर यांनी बाहेर काढले. या प्रकरणी गायकवाड यांनी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली होती

प्रसूती रुग्णालय असल्याने एकाही पुरुषाला आत सोडले जात नाही. त्यासाठी त्यांना ताकीद दिली होती. त्यांच्यासोबत अनुचित प्रकार केला नाही, अशी भूमिका डॉक्टर कक्कर यांनी मांडली आहे.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________