नगरसेवक रंजित बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त ई श्रम कार्ड चे वाटप

29 वार्ड क्र. 24 चे कार्यतत्पर नगरसेवक रंजित बनसोडे यांचा वाढदिवस विविध समाजीक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

नगरसेवक रंजित बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त ई श्रम कार्ड चे वाटप
e labor card

नगरसेवक रंजित बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त ई श्रम कार्ड चे वाटप

29 वार्ड क्र. 24 चे कार्यतत्पर नगरसेवक रंजित बनसोडे यांचा वाढदिवस विविध समाजीक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:


बीड दिनांक 29 वार्ड क्र. 24 चे कार्यतत्पर नगरसेवक रंजित बनसोडे यांचा वाढदिवस विविध समाजीक उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या सूचनेवरून प्रभागातील गोर गरीब, कष्टकरी कामगार नागरिकांसाठी ई-श्रम कार्ड ची नोंदणी आणि कार्ड चे वाटप करण्यात आले.
रणजीत बनसोडे यांच्या धानोरा रोड वरील कार्यालयात ई श्रम कार्ड ची नोंदणी व वाटप करण्यात आले. प्रभाग क्रमांक 24 मधील 16 ते 59 वयोगटातील सर्व स्त्री पुरुष नागरिकांची नोंदणी व कार्ड वाटप करण्यात आले.(e labor card)


यासाठी विश्वालय सेवाभावी संस्थाकडून पुढाकार घेण्यात आला. वार्डातील नागरीकांच्या अडचणी लक्ष्यात घेता या कार्डसाठी नागरीक सतत धावपळ  करत होते. नागरिकांच्या समस्यांचा हा एक भाग वाटला, व नागरिकांच्या  हिताचा व गरजेचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेऊन हा उपक्रम राबविला असल्याचे नगरसेवक रंजित बनसोडे यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त होणारा इतर खर्च टाळून ई श्रम कार्ड चा स्तुत्य उपक्रम राबविल्यामुळे नागरिकांनी नगरसेवक रंजित बनसोडे यांचे तोंडभरून कोतुक केले. नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यासाठी सहकारी नगरसेवक भैय्यासाहेब मोरे यांनी व सर्व सहकारी मित्रांनी अथक परिश्रम घेतले. वाढदिवसानिमित्त चांगला उपक्रम असल्याने सकाळपासूनच नागरिकांची विशेषतः महिलांची प्रचंड गर्दी पहावयास मिळाली.(e labor card)