पंधरा दिवसात परळी वै. तालुक्यात 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाकळी देशमुख येथील शेतकरी नागोराव धोंडीबा शिंदे यांची आत्महत्या

मागच्या काही वर्षाचा दुष्काळ व या वर्षी झालेली अतिवृष्टी बँकेचे कर्ज खचलेल्या मानसिकतेतून शेतकरी कै.नागोराव धोंडीबा शिंदे टाकळी देशमुख तालुका परळी वै जिल्हा बीड यांची आत्महत्या.

पंधरा दिवसात परळी वै. तालुक्यात 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाकळी देशमुख येथील शेतकरी  नागोराव धोंडीबा शिंदे  यांची आत्महत्या
farmers commit suicide

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

परळी वैद्यनाथ मागच्या काही वर्षाचा दुष्काळ व या वर्षी झालेली अतिवृष्टी बँकेचे कर्ज खचलेल्या मानसिकतेतून शेतकरी कै.नागोराव धोंडीबा शिंदे टाकळी देशमुख तालुका परळी वै जिल्हा बीड यांची आत्महत्या.सततची नापिकी व यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या विवंचने तून परळी तालुक्यात पंधरा दिवसात तीन आत्महत्या... शेतकऱ्यासाठी राज्य सरकार पूर्ण अपयशी ठरले असून गेल्या तीन महिन्यापासून अतिवृष्टीने पूर्णपणे पीक उद्ध्वस्त झालेली असताना आजतागायत शेतकऱ्याला या तिघाडी सरकारने कसल्याही प्रकारची मदत केली नाही. असा आरोप संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी केला आहे.(farmers commit suicide)

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात स्थानिक आमदार तथा जिल्ह्याचे सक्षम पालकमंत्री असताना 15 दिवसांमध्ये 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात.. हे दुर्दैव आहे. शेतकऱ्याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून गेंड्याच्या कातडीचे निगरगट्ट सरकार परळी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आता तरी जागे होऊन लवकरात लवकर आर्थिक मदत देईल का  अजून किती आत्महत्या होऊ देणार या दळभद्री सरकारचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध व शेतकर्‍यांनी आत्महत्या न करता खंबीरपणे संघर्ष करावा तुमच्या सोबत आम्ही आहोत. असे सुद्धा आव्हान  संभाजी ब्रिगेड चे परळी तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी केले आहे.(farmers commit suicide)