शेतकर्यां च्या न्याय हाक्का साठी,सर्व पक्षीय मोर्चा तहसिल वर धडकणार

अनेकांच्या राहत्या घरांची पडझड झाली, लेकरप्रमाणे सांभाळलेल पशुधन पुराच्या पाण्यात वाहून,वीज पडून व अंगावर गोठ्यातील झाड पत्रे पडून मरून पडलेल बळीराजाने उघड्या डोळ्यांनी पाहिल.बळीराजा हवालदिल झाला.

शेतकर्यां च्या न्याय हाक्का साठी,सर्व पक्षीय मोर्चा तहसिल वर धडकणार
farmers demand for justice

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई ..ऑगस्ट व सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.उभं पीक पाण्यात गेल,अनेकांच्या राहत्या घरांची पडझड झाली, लेकरप्रमाणे सांभाळलेल पशुधन पुराच्या पाण्यात वाहून,वीज पडून व अंगावर गोठ्यातील झाड पत्रे पडून मरून पडलेल बळीराजाने उघड्या डोळ्यांनी पाहिल.बळीराजा हवालदिल झाला.अश्या परिस्थितीत त्याला अपेक्षा असते ती आपण मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या सरकारकडून भरीव मदतीची.(farmers demand for justice)

मात्र वसुली करण्यात व्यस्त असलेल्या  या राज्य सरकारला शेतकऱ्यांचे काहीच देणे घेणे नाही.जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीच्या लोकांचे चोचले पुरवून खुर्ची टिकवण्यात व्यस्त आहेत.राज्याचे जबाबदार मंत्री जिल्ह्यात येऊन सत्कार घेऊन राजकीय भविष्यवाणी करण्यात व्यस्त आहेत.हे अस काहीच देणार नाहीत. यांचं नाक दाबून आपल्या सर्वांना मिळूनच तोंड उघडावे लागेल.या मोर्च्यांनंतर मी आमरण उपोषण करणार आहे.विधानसभेत देखील आवज उठवणार आहे.शेवटी कुठल्याच पर्यायाने हे सरकार शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्यायला तयार नाही हे निदर्शनास आल्यानंतर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला देखील मागे पुढे पाहणार नाही.

मात्र मला खात्री आहे 14 तारखेच्या सर्वपक्षीय मोर्चात आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित झालोत,आणि आपली वज्रमुठ आवळली तर या सरकारला आपल्या मागण्या मान्य करायला भाग पाडू.14 तारखेच्या सर्व पक्षीय मोर्चात आपली प्रत्येकाची उपस्थिती शेतकऱ्यांना न्याय देईल.हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा ठिकाण छत्रपती शिवजी महाराज चौक, गेवराई,आमदार लक्ष्मण माधवराव पवार.(farmers demand for justice)