फॅशन जीवन चक्र

फॅशन हा एक वास्तविक जीवनाचा मार्ग आहे - आपण ज्या प्रकारे पोशाख करता, आपली सामान कसे घालता, आपण काय परिधान करता, आपण कोठे खरेदी करता, आपण कसे खरेदी करता, आपण आपले कपडे आणि उपकरणे कुठे घालता, आपल्या डिस्पोजेबल उत्पन्नाचे वर्णन देखील करते तुमची जीवनशैली. ... म्हणून फॅशन आणि जीवनशैली अविभाज्य आहेत.

फॅशन जीवन चक्र
ह्या चित्रांत आपल्याला फॅशन चक्र कश्या पद्धतीने चालते ते कळण्यास मदत होते.

फॅशन जीवन चक्र

 • आजकालच्या काळात फॅशन हे एक लोकप्रिय जगप्रसिध्द सांस्कृती मानली जाते.जी पुरातन काळापासून चालत आली आहे.जसे काळ बदलत गेले तसतशी फॅशन सुद्धा विवीध प्रकारे आपली कामगिरी जगासमोर विविध रित्या स्थापन करत आहे. फॅशन हे कपडे , समान , आणि फर्निचर या प्रकारात मोडतात. ज्याचा उपयोग प्रत्येका द्वारे केला जाऊ शकतो. 
  फॅशन हा सांस्कृतिच्या बाबतीत विषय आहे.बहुतेकदा आपण फॅशन ची वाख्या हे कोणत्यााही वेळी ड्रेस किंवा 
  वतनाच्या प्रचलित शैलीला ठरवतो.आणि त्याचा जोरदार सकारत्मक परिणाम सुद्धा आपल्याला दिसून येतो. फॅशन हे घडणाऱ्या घडामोडीच्या बदला द्वारें दर्शविला जातो.
  फॅशन हे मानवी जीवनासाठी महत्वाचे आहे का?
  होय , फॅशन हे नक्कीच मानवी जीवनासाठी महत्त्वाची बाब आहे.कारण ते लोकांना त्यांचे व्यक्तीमहत्व फॅशन द्वारें व्यक्त करण्याची अनुमती देते.
  सर्व युगात पुरातन काळापासून फॅशन हा सामाजिक आणि संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. मानवी जगाने जसे विकसित केले तसतसे कापडाच्या आणि लोक परिधान करण्यासाठी वेगवेगळया साहित्या मधून लोक विविध वस्तू तयार करून विकसित होऊ लागले.आणि फॅशन या क्षेत्रांत यशस्वी होऊ लागले.


फॅशन जीवन चक्र ( The life cycles of fashion ) म्हणजे काय?


ईतर जगातल्या कोणत्याही उत्पादना प्रमाणे फॅशन चे सुद्धा जीवन चक्र ( The life cycles of fashion ) आहे. फॅशन हे विशिष्ट वेळ आणि परिस्थितीत ग्राहकांनी स्वीकारलेली तात्पुरती चक्रीया घटना आहे.फॅशन जीवन हे एक विशिष्ट विषाणू सारखे आहे. विशिष्ट देखावा, आकार किंवा कपड्याचा प्रकार त्या दरम्यान फॅशन ही अस्तित्वात असते.प्रत्येक प्रकारच्या फॅशन च्या जीवन चक्रादरम्यान त्याचे वर्गीकरण पाच टप्यात करण्यात आले आहे. या चक्रामध्ये पाच प्रकारची चरण येतात जसे परिचय चरण , वाढ , संपृक्तता/प्रसिध्दी,घट/ कमी , नकार , आणि फॅशन चे आउट स्टेज असते.


शैलीचा परिचय : परिचय म्हणजे फॅशन किंवा ट्रेन्डचा परिचय. हा परिचय एखाद्या डिझाईन द्वारें किंवा आऊटलेटने अश्या विशिष्ट पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर सादर केला जातो.डिझायनर त्याचं संशोधन आणि  नवीन कालाकूसरी करून त्याच्या  कल्पना वापरून नवीन शैली लोकांनसमोर मांडतात. रेखा,आकार,रंग,फॅब्रिक आणि तपशील आणि त्यांचे एकमेकांशी असलेले नाते यासारखे घटक बनवून डीझायनेर नवीन डिझाईन तयार करतात.फॅशन जीवन चक्र (The life
 cycles of fashion ) याची वाढ होण्यासाठी आपण वेगवेगळे टी व्ही शो किंवा फॅशन शो , टी व्ही जाहिरात , मासिकेत आणि जाहिरात अश्या प्रकारे फॅशन युगाचा प्रचार केला जातो. सध्याच्या काळात ब्रँड ही एक नवीन चाल लागली आहे. नवीन विविध प्रकारचे ब्रँड उधभवणात आले आहे तर आता केवळ विशिष्ट ब्रॅण्डद्वारे सुद्धा प्रचिती केली जाते. आणि ते उत्पादन केवळ मोठमोठया दुकानात किंवा ब्रँड मधेच उपलब्ध असतात.सायकलच्या या पहिल्या टप्प्यात केवळ शैली आणि नवीनपणा दर्शवला जातो. बऱ्याच नवीन शैली उच्च किमतीत सादर केल्या जातात. ती शैली लोकप्रिय झाल्यास डिझाईनसला आर्थिक मदत सुद्धा केली जाते. आणि कच्या मालाची गुणवत्ता किंवा उत्कृष्ट कारागिरी यावर काही मर्यादा घालून डिझाईन करण्याची दिली जाऊ शकते. उत्पादन खर्च जास्तच असतो आणि परिणामी फार कमी लोकांना परवडणार असे असते.आणि कधीकधी कमी प्रमाणात उत्पादनाला अधिक भाव सुद्धा मिळतो.


संपृक्तता : हा टपा विशेष टपा म्हूनन संबोधल्या जातो.करण या टप्या दरम्यान , फॅशन साधारणपणे सामन्य बनविली जाते. बाजारात सर्वसामान्य दुकानात उपलब्ध असतो.आणि बाजारात ही फॅशन किंवा हा ट्रेन्ड किती काळ राहील हे स्पष्ट दर्शवितो. काही उत्पादनाची कालावधी एक वर्ष किंवा दहा वर्षाचा सुद्धा असू शकतो.या टप्यामध्ये सगळे फॅशनच्या वाढीवर किंवा त्याच्या चालण्याच्या काळावर अवलंबून असते.


घट / उतरती अवस्था : कोणत्याही प्रकारच्या उत्पादनात एक पर्यरी ही उतरती अवस्था किंवा घट ही सुद्धा असते. काही दिवसानी एखादया उत्पादनाचा ट्रेड गेला की ती वस्तू बाजारात अगदी सहजपने किंवा ती अगदीच सामान्य होऊन जाते.त्या काळात फॅशन नसलेल्या अश्या वस्तू किरकोळ स्टोअरमध्ये सवलतीच्या दरात  मिळून जातात. ते आऊट ऑफ फॅशन झालं असे सुद्धा बरेचदा आपण म्हणतो.आणि त्याच ट्रेन्ड नसल्यामुळे ती वस्तू आपल्याला सहजपने कोणत्याही दुकानात फार कमी दरात उपलब्ध होते.
फॅशन जीवन चक्राच्या या काळात फॅशन उत्पादनाची किंमत देखील घसरते. विशेषतः वाढीच्या काळात किमतीत मोठी वाढ दिसून येते. आणि घासरणच्या काळात  किंमत कमी होते.शेवटी त्या काळात ६०% - ७०% अशी सवलत लागू करणात येते.
फॅशन सायकलच्या शेवटच्या टप्प्यात, काही ग्राहक आधीपासूनच नवीन रूपांकडे वळले आहेत, ज्यामुळे नवीन चक्र सुरू होते.  एखादी स्टाईल फक्त फॅशनच्या बाहेर असल्यामुळे ती नाकारली जाते किंवा त्या वस्तू बद्दल लोकप्रियता कमी होते.


  फॅशन आऊट स्टेज : फॅशन आऊट स्टेज म्हणजे आकार किंवा शैली जी त्याच्या प्रास्ताविक अवस्थेत संपते ती फक्त एफएडीएस म्हणून ओळखली जाते त्याचप्रमाणे जर ती शैली किंवा लूक त्याच्या संपृक्ततेच्या अवस्थेपर्यंत राहिली तर ती फॅशन म्हणून ओळखली जाते आणि ती शैली किंवा देखावा पुढे जात राहिला तर त्यातून लोकप्रियता निर्माण होते.


फॅशन जीवन चक्र (The life cycles of fashion) हे किती काळ असते? 
फॅशन उद्योगातील डिझानर्स म्हणतात की दर 20 वर्षात चक्र हे बदलते.त्यानंतर वेगवेगळी नवीन ट्रेन्ड निर्माण होतात.तर काळानुसार ट्रेन्ड मध्ये बद्दल हा आवश्यक असतो.ट्रेन्ड हा दर सहा महिन्यात बदलतो आणि नवीन शैली लाँच होते.


फॅशनची गरज का आहे ?
फॅशन हे समाजात फार महत्वाचे आहे कारण त्यात स्वतःचे व्यक्तीमहत्त्व साजरे करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणण्याची क्षमता आहे.त्यांनी एकजूट निर्मात होते.फॅशन हा संघटीत आनंद घेण्याचा उत्तम मार्ग आहे.