जिल्हा परिषद शाळा शेले येथे आरोग्य शिबिराला उत्सुकतेने प्रतिसाद

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा आरोग्य शिबीर जि.प. मराठी शाळा शेले येथे मोठ्या उत्साहात पार पाडला.

जिल्हा परिषद शाळा शेले येथे आरोग्य शिबिराला उत्सुकतेने प्रतिसाद
free health camp

वाडा सत्यवान तरे:

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था यांच्यातर्फे  मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा आरोग्य शिबीर   जि.प. मराठी शाळा शेले येथे  मोठ्या उत्साहात पार पाडला.या कार्यक्रमास मान्यवरांनी  दिप प्रज्वलन करून  आरोग्य शिबिराचे उद्घाटन महिला सक्ष्मीकरण पालघर जिल्हा प्रमुख सौ.हेमांगीताई पाटील शशिकांत पाटील कैलास पाटील सुधीर विशे व पत्रकार सत्यवान तरे यांच्या हस्ते करण्यात आले.(free health camp)

यावेळी प्रमुख अतिथी कुडूस ग्रामपंचायत उपसरपंच गिरीश चौधरी  हेही उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात मधुमेह ,ई.सी.जी., रक्तदाब, बी.एम.आय., जनरल तपासणी व  डोळ्यांची तपासणी करून मोफत औषधे चष्मे वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिरात  शेकडोंच्या वर रुग्णांना मोफत वैद्यकीय  व डोळ्यांची तपासणी करून योग्य सल्ला दिला. यावेळी या कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वस्त महिला सक्ष्मीकरण पालघर जिल्हा प्रमुख सौ. हेमांगीताई पाटील जिजाऊ कामगार नेते महेंद्र ठाकरे वाडा तालुका जिजाऊ संघटना अध्यक्ष शशिकांत पाटील अरविंद देशमुख संदीप ठाकरे सुधीर विशे संचिता पाटील तन्वी पानवे जिजाऊ संघटना शेले शाखा अध्यक्ष परशुराम पाटील उपाध्यक्ष अरुण घरत  कार्याध्यक्ष रमेश गगे संघटक अशोक घरत व जिजाऊ सदस्य  उपस्थित राहुन  परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद देशमुख व राहूल पाटील सर यांनी केले.(free health camp)