पंकज कुमावत यांचा परळीत धमाका : जुगार अड्ड्यावर धाड,लाखोंचा ऐवज जप्त

बीड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अवैध धंद्यावर पंकज कुमावत यांनी फास आवळला असून बीड मधील मोठ्या कारवाई नंतर परळी शहरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर ए.एस.पी पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घालत तब्बल सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पंकज कुमावत यांचा परळीत धमाका : जुगार अड्ड्यावर धाड,लाखोंचा ऐवज जप्त
gambling den in Parli

पंकज कुमावत यांचा परळीत धमाका : जुगार अड्ड्यावर धाड,लाखोंचा ऐवज जप्त

बीड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अवैध धंद्यावर पंकज कुमावत यांनी फास आवळला असून बीड मधील मोठ्या कारवाई नंतर परळी शहरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर ए.एस.पी पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घालत तब्बल सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अवैध धंद्यावर पंकज कुमावत यांनी फास आवळला असून बीड मधील मोठ्या कारवाई नंतर परळी शहरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर ए.एस.पी पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घालत तब्बल सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कुमावत यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत जवळपास ११४ आरोपींवर गुन्हा दाखल केला असून २० आरोपींना अटक करण्यात आली आहे.परळी शहर,संभाजी नगर व ग्रामीण पोलिसांना जे जमले नाही ते कुमावत यांनी करून दाखविल्याने परळी शहरात कुमावत यांची जोरदार चर्चा होत आहे.(gambling den in Parli)


गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर छापे घालून जिल्ह्यात आपली ओळख  निर्माण करणाऱ्या सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना गुप्त खब-या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार परळी शहरातील हनुमान नगर येथे पत्र्याच्या शेड मध्ये जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी कुमावत यांच्या पोलिस पथकाने छापा घातला तेव्हा आरोपी नामे विलास पावडे, सुरेश तरडे, बालासाहेब मुंडे ,संतोष साळुंके, राम बदने, प्रल्हाद काळे, प्रेमचंद आव्हाड यासह इतर काही इसम शिवाजी जाधव यांच्या पत्र्याच्या सेड मधील एका रूम मध्ये एकत्र बसून जुगाराचा अड्डा तयार करून त्यामध्ये कल्याण मटका, मधूर नाईट व मधूर डे जुगाराचे आकडे मोबाईलवर घेऊन जुगाराच्या पट्ट्या छाटीत असल्याचे आढळून आले. 

पथकातील पोलिसांनी गुरुवार दि 30 रोजी रात्री साडेनऊ वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी 20 व्यक्ती जागीच मिळून आले त्यांना ताब्यात घेत नगदी व कल्याण मटका, मधूर डे मधूर नाईट मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 13 हजार 310/ रुपयांचा मुद्देमाल नगदी व मोबाईल, साहित्य मिळून आले वरील आरोपीचे मोबाईलवर आकडे देणाऱ्या इसमांची माहिती घेऊन नावे निष्पन्न करून एजंट बुक्की मालक असे एकूण एकूण 1आरोपीविरुद्ध114 पोलीस ठाण्यात कलम 4, 12 अ महाराष्ट्र जुगार कालमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(gambling den in Parli)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/