सुवर्ण मंदिरातील धार्मिक कार्यात अडथळा आणणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण,मारहाणीत तरुणाचा मृत्यू

शीख धर्मीयांचे सर्वात पवित्र स्थळ म्हणजे सुवर्ण मंदिरात एक तरुण घुसला आणि त्याने पवित्र गुरु ग्रंथ साहिबची विटंबना केली. तेव्हा उपस्थित भाविकांनी त्याला जबर मारहाण केली.

सुवर्ण मंदिरातील धार्मिक कार्यात अडथळा आणणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण,मारहाणीत तरुणाचा मृत्यू
golden temple vellore

सुवर्ण मंदिरातील धार्मिक कार्यात अडथळा आणणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण,मारहाणीत तरुणाचा मृत्यू

शीख धर्मीयांचे सर्वात पवित्र स्थळ म्हणजे सुवर्ण मंदिरात एक तरुण घुसला आणि त्याने पवित्र गुरु ग्रंथ साहिबची विटंबना केली. तेव्हा उपस्थित भाविकांनी त्याला जबर मारहाण केली.

तृप्ती पवार:

शीख धर्मीयांचे सर्वात पवित्र स्थळ म्हणजे सुवर्ण मंदिरात एक तरुण घुसला आणि त्याने पवित्र गुरु ग्रंथ साहिबची विटंबना केली. तेव्हा उपस्थित भाविकांनी त्याला जबर मारहाण केली.या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. या घटानेनंतर सुवर्ण मंदिरातील वातावरण चांगलेच तापले होते. उपस्थित भाविकांनी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधन समितीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. आधी तरुणाचा मृतदेह दाखवला जावा त्यानंतरच पोलिसांकडे मृतदेह सोपवला जावा अशी मागणी उपस्थित भाविकांनी केली.(golden temple vellore) 

आज सायंकाळी सहा वाजता सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिबची नेहमीप्रमाणे पुजा सुरू होती. गुरु ग्रंत साहिबजवळ दोन भाविक पुजा करत होते. भाविक आळीपाळीने दर्शन घेत होते. तेव्हा एक तरुण अचानक गाभार्‍यात घुसला, त्याने गुरू ग्रंथ साहिब समोर असलेली पवित्र कृपाण उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित भाविकांनी त्याला धरून बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला.

मृत तरुणाचे वय २४-२५ असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जेव्हा त्याने मंदिरात प्रवेश केला तेव्हा त्याने डोक्याला पिवळा फेटा बांधला होता. गाभार्‍यात पोहोचेपर्यंत त्याची कुठलीच हालचाल संशयास्पद वाटली नाही. परंतु सर्व भाविक रांगेने दर्शन घेत होते, त्याचा दर्शनाचा क्रमांक आला तेव्हा त्याने थेट गाभार्‍यात प्रवेश केला. गुरु ग्रंथ साहिबची विटंबना केली आणि पवित्र कृपाण हाती घेण्याचाही प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित भाविकांनी त्याला बाहेर काढले आणि जबर मारहाण केली. या मारहाणी त्याचा मृत्यू झाला. तरुणाचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. तसेच या तरुणासोबत आणखी कोण आले होते त्याचाही तपास केला जाणार आहे, त्यामुळे या तरुणाचा नेमका उद्देश काय होता याचा शोध लागलेला नाही.(golden temple vellore)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link