नामंतर लढ्यातील योद्य्दांचा समता सैनिक दलाच्या वतीने सन्मान...

नबीड येथे 14 जानेवारी हा दिवस मराठवाड्या सह देशभर नामांतर वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बीड भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक संघाच्या वतीने नामांतराचा लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेले तुरुंगवास भोगलेले आंदोलन करते. यांना आज बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समोर सन्मानपत्र गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

नामंतर लढ्यातील योद्य्दांचा समता सैनिक दलाच्या वतीने सन्मान...
Honor on behalf of Samata Sainik Dal...
नामंतर लढ्यातील योद्य्दांचा समता सैनिक दलाच्या वतीने सन्मान...
नामंतर लढ्यातील योद्य्दांचा समता सैनिक दलाच्या वतीने सन्मान...

नामंतर लढ्यातील योद्य्दांचा समता सैनिक दलाच्या वतीने सन्मान...

नबीड येथे 14 जानेवारी हा दिवस मराठवाड्या सह देशभर नामांतर वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बीड भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक संघाच्या वतीने नामांतराचा लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेले तुरुंगवास भोगलेले आंदोलन करते. यांना आज बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समोर सन्मानपत्र गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये ज्या महिला व पुरुषांनी आपल्या घराची तमा न बाळगता विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यात यावे यासाठी जेल भोगली, मोर्चे काढले, स्वतःवर लाठीचार्ज सहन केला, आंदोलनात सहभागी झाले अशा सर्वच शहरातील भीम योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यामध्ये प्रामुख्याने अंनत सरवदे,बबन वडमारे,सोपनराव तांगडे, मोईन मास्टर, सुशिलाताई मोराळे, कौशल्यबाई आश्रुबा वडमारे, दिनकर बोराडे, डॉ.कृष्णकुमार कांबळे,अरूण सवाई, गौतम सोनवणे, अँड.राजन साळवी, भास्कर कागदे, प्रकाश वडमारे, संदिपान हजारे, मच्छिंद्र डोंगरे (नाना), धर्मराज मजमुळे,शिवाजी
वावळकर. यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाची मानवंदना देण्यात आली,व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण व सामुदायिक  त्रिशरण पंचशिल घेण्यात आले.

यामध्ये जिल्हाध्यक्ष विष्णू कांबळे, समता सैनिक सचिव अमरसिंह ढाका, सिद्धार्थ जगझाप, गौतम खेमाडे,धर्मराज मुजमुले, बालाजी जगतकर,गौतम कांबळे, यावेळी उपस्थित नामांतर योद्ध्यांना पेढे भरून त्यांचा सन्मान केला.अभिवादन ग्रुपच्या वतीने पेढे भरून करण्यात आला यावेळी अभिवादन ग्रुपचे सर्व टीम उपस्थित होती. त्यामध्ये गुलाब भोले, डि.जी. वानखेडे, प्रा. अशोक गायकवाड, प्रशांत वासनिक, कॅप्टन राजाभाऊ आठवले, भास्कर सरपते,आदि शहरातील प्रतिष्ठित नागरिक, उपासक-उपासिका, बालक बालिका, मोठ्या संख्येने उपस्थित होते सहभागी होते.

 चौकट 

नामांतर योद्ध्यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली त्यामध्ये प्रामुख्याने प्रा. सुशीला मोराळे, बबन वडमारे, सोपानराव तांगडे, मोईन मास्टर, यांनी आपल्या या अनुभवांना या ठिकाणी  नामांतर लढ्यातील आठवणी  भाषनातुन  व्यक्त केल्या व उपस्थित समुदायाला मंत्रमुग्ध केले व जुन्या आठवणींना उजाळा, दिला नामांतराच्या लढाईचे चित्र आजच्या समता सौनिक दला व जनते उभा केले.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________