पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन ३० ऑक्टोबर रोजी हॉटेल वैशाली कट्ट्यावर...| हॉटेल वैशाली चे जगन्नाथ शेट्टी आणि ज्येष्ठ कामगारांना प्रकाशनाचा मान...   

पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता फर्गसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली कट्ट्यावर होणार आहे.पुणेकरांचे लाडके हॉटेल वैशाली चे मालक जगन्नाथ शेट्टी आणि खवैय्या पुणेकरांची मनोभावे खान पान सेवा करणाऱ्या या हॉटेल च्या कामगारांना प्रकाशनाचा मान देण्यात आला असून या सर्वांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन ३० ऑक्टोबर रोजी हॉटेल वैशाली कट्ट्यावर...| हॉटेल वैशाली चे जगन्नाथ शेट्टी आणि ज्येष्ठ कामगारांना प्रकाशनाचा मान...   
Publication of Punya Bhushan Diwali issue on 30th October at Hotel Vaishali Katta ... | Hotel Vaishali's Jagannath Shetty and senior workers honored for publication.
पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन ३० ऑक्टोबर रोजी हॉटेल वैशाली कट्ट्यावर...| हॉटेल वैशाली चे जगन्नाथ शेट्टी आणि ज्येष्ठ कामगारांना प्रकाशनाचा मान...   

पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन ३० ऑक्टोबर रोजी हॉटेल वैशाली कट्ट्यावर...| हॉटेल वैशाली चे जगन्नाथ शेट्टी आणि ज्येष्ठ कामगारांना प्रकाशनाचा मान...   

पुणे : पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता फर्गसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली कट्ट्यावर होणार आहे.पुणेकरांचे लाडके हॉटेल वैशाली चे मालक जगन्नाथ शेट्टी आणि खवैय्या पुणेकरांची मनोभावे खान पान सेवा करणाऱ्या या हॉटेल च्या कामगारांना प्रकाशनाचा मान देण्यात आला असून या सर्वांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत पुण्यातील यशस्वी साहित्य संमेलनानंतर पुणे शहरावर दरवर्षी दिवाळी अंक 'पुण्यभूषण' या नावाने काढण्याची अभिनव प्रथा डॉ सतीश देसाई यांनी साहित्य संस्कृती विश्वात सुरु केली.एका शहराला समर्पित असलेला हा एकमेव दिवाळी अंक मानला जातो.या परंपरेतील हा दहावा दिवाळी अंक आहे.

पुण्यभूषण फौंडेशन आणि त्रिदल संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई म्हणाले,’’दरवर्षी आम्ही पुण्याला साजेशी संकल्पना घेवून प्रकाशन समारंभ आयोजित करीत असतो.यावर्षी पुण्याच्या कट्टा संस्कृतीतील मानाचे पान असलेल्या 'वैशाली हॉटेल' कट्ट्यावर प्रकाशन समारंभ करीत आहोत. यापूर्वी पोस्टमन,सांस्कृतिक विश्व ची बातमीदारी हाताळणारे पत्रकार ,दगडूशेठ गणेश मंदिर ,बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखे विविध मान्यवर पुणेकरांना आणि ठिकाणांना प्रकाशन समारंभाचा मान दिला गेलेला आहे.

यावर्षीच्या अंकातील पहिले मानाचे पान जगन्नाथ शेट्टी यांना समर्पित करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे ,पुणेकरांचे आणि अनिवासी पुणेकरांचे लेख ,आठवणी हे यावर्षीच्या पुण्यभूषण दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे.

पुणे

प्रतिनिधी - अशोक तिडके

_________