मोखाडा तालुक्यातील नितीन आहेर यांना जिजाऊ संस्थेचा आदर्श शिक्षक तर चार युवकांना कोवीड योध्दा पुरस्कार प्रदान

सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या निलेशजी सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोखाडा तालुक्यातील शिक्षक नितिन आहेर यांना आदर्श शिक्षक तर रोहीत चक्रवर्ती,सुमित जाधव,एजाज पठाण व अजय शेळकंदे यांना माजी उपाध्यक्ष तथा माजी आरोग्य सभापती निलेश सांबरे व जिल्हाध्यक्ष महीला सक्षमीकरण जिजाऊ संस्था यांंच्या हस्ते कोवीड योध्दा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मोखाडा तालुक्यातील नितीन आहेर यांना जिजाऊ संस्थेचा आदर्श शिक्षक तर चार युवकांना कोवीड योध्दा पुरस्कार प्रदान
ideal teacher of Jijau Sanstha

मोखाडा तालुक्यातील नितीन आहेर यांना जिजाऊ संस्थेचा आदर्श शिक्षक तर चार युवकांना कोवीड योध्दा पुरस्कार प्रदान

सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या  निलेशजी सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोखाडा तालुक्यातील शिक्षक नितिन आहेर यांना आदर्श शिक्षक तर रोहीत चक्रवर्ती,सुमित जाधव,एजाज पठाण व अजय शेळकंदे यांना माजी उपाध्यक्ष तथा माजी आरोग्य सभापती निलेश सांबरे व जिल्हाध्यक्ष महीला सक्षमीकरण जिजाऊ संस्था यांंच्या हस्ते कोवीड योध्दा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मोखाडा प्रतिनिधी माधुरी आहेर:

सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या  निलेशजी सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोखाडा तालुक्यातील शिक्षक नितिन आहेर यांना आदर्श शिक्षक तर रोहीत चक्रवर्ती,सुमित जाधव,एजाज पठाण व अजय शेळकंदे यांना माजी उपाध्यक्ष तथा माजी आरोग्य सभापती निलेश सांबरे व जिल्हाध्यक्ष महीला सक्षमीकरण जिजाऊ संस्था यांंच्या हस्ते कोवीड योध्दा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कासट, नगरसेवक हरेष पष्टे, रावळ दादा,प्रो कबड्डी पटू निलेश शिंदे,पत्रकार अमोल सांबरे व शिक्षिका स्मिता सोहनी आदि उपस्थित होते.(ideal teacher of Jijau Sanstha)

जिजाऊ ही फक्त संघटना नसून ती एक विचारधारा आहे व या विचार धारेच्या माध्यमातून राष्ट्रहितासाठी झटणारे व सामाजिक बांधिलकी जोपासणारे युवक तयार झाले पाहीजे ज्या माध्यमातून गाव खेडेपाड्यात विकासाची कामे झाले पाहीजे असे प्रतिपादन निलेश सांबरे यांनी केले.दर्जेदार शिक्षण,दर्जेदार आरोग्य,महीला सक्षमीकरण करण्यासाठी जिजाऊ संस्था प्रभावीपणे काम करत आहे व शेवटपर्यंत काम करत राहील.गावखेड्यातील पाणीप्रश्न जिजाऊ सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे व गावागावात विकासकाम पोहचेपर्यंत जिजाऊ शेवटपर्यंत सामाजिक काम करत राहील असेही निलेश सांबरे म्हणाले.शिक्षकांनी कोवीड काळात चांगले काम केले असेही सांबरे यावेळी म्हणाले.यावेळी पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून १० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच जवळपास २० युवकांना कोवीड योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 


           स्वच्छता अभियान,तंटामुक्ती,कोरोना जनजागृती यात नितिन आहेर यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे. तत्कालीन सीईओ निधी चौधरी व तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन आहेर यांनी स्वच्छ भारत अभियानात मोखाडा तालुक्यात उत्तम भूमिका निभावली आहे .गावागावात जाऊन गाव स्वच्छता मोहीम राबवत नंतर उपस्थित नागरीकांची जनजागृती करत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे तर महालक्ष्मी सरस या राज्य शासनाच्या बचत गटाच्या महत्त्वकांक्षी वस्तू विक्री व प्रदर्शन कार्यात तब्बल सात वर्षे रेक्लमेशन मैदान वांद्रे येथे विशेष योगदान दिले आहे.महालक्ष्मी सरस ची राज्यस्तरीय स्मरणिका बनवणे कामी त्यांनी सहा वर्ष काम पाहिले असून बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंची जाहिरात अनाउन्समेंट च्या माध्यमातून प्रभावीपणे करत त्यांनी चांगले योगदान या सामाजिक कामात दिलेले आहे. तसेच महालक्ष्मी सरस, पंचायतराज पुरस्कार,कृषी दिन, अभियंता दिन या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे त्यांनी प्रभावीपणे सूत्रसंचालनन केले आहे.

तर गटविकास अधिकारी टि वो चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मोखाडा तालुक्यात एकपात्री अभिनयातून स्वच्छता,शिक्षण व आरोग्य या विषयांवर नितिन आहेर यांनी गावागावात जाऊन जनजागृती केलेली  आहे.स्वच्छता अभियानातील योगदानाबद्दल तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी नितिन आहेर यांना "अचिवर ऑफ द विक" हा पुरस्कार देऊन गौरविले आहे.त्यांच्या स्वच्छता अभियानातील जनजागृतीबद्दल तत्कालीन  सभापती प्रदिप वाघ व तत्कालीन गटविकास अधिकारी प्रमोद  गोडांबे यांनी मासिक मिटींगमध्ये अभिनंदनाचा ठराव मंजूर केला असून आहेर यांना सन्मानित केले आहे.पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सतिश गवई यांच्या समवेत त्यांनी गावागावात कोरेना जनजागृती कामी केलेले आहे.(ideal teacher of Jijau Sanstha)