घे भरारी व्हाट्सअप समुहाच्या दिवाळी साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन...

महाराष्ट्र महिला उद्योग आघाडीच्या पुढाकाराने “घे भरारी व्हाट्स अप” समुहा द्वारे धायरी सिहगड रस्ता गणेश नगर येथे दिवाळी वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

घे भरारी व्हाट्सअप समुहाच्या दिवाळी साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन...
Inauguration of Ghe Bharari WhatsApp Group's Diwali Literature Exhibition ...

घे भरारी व्हाट्सअप समुहाच्या दिवाळी साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन...

पुणे : महाराष्ट्र महिला उद्योग आघाडीच्या पुढाकाराने “घे भरारी व्हाट्स अप” समुहा द्वारे धायरी सिहगड रस्ता गणेश नगर येथे दिवाळी वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.या ठिकाणी सुमारे ३० स्टॉल्स असून त्यात समूहातील महिलांनी निर्मित केलेल्या वस्तूंची रास्त भावात विक्री करण्यात येणार आहे.यात फराळचे पदार्थ,पणत्या,कुरडाई,पणत्या,मसाले,कपडे यांचा समवेश आहे.

उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष पी.टी काळे,रेश्माताई पोकळे(घे भरारी-फक्त महिला-संकल्पना)मेरीताई फर्नांडिस,राजश्रीताई मोहिते,सविताताई बाबर,दीपालीताई पवार,मीराताई बराटे,नगरसेवक राजाभाऊ लायगुडे,राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष स्वातीताई पोकळे,नगरसेविका अश्विनीताई पोकळे,ज्योतीताई कोंडे,दिलीप कांबळे आदी मान्यवरांच्या बरोबरच घे भरारी व्हाट्सअप ग्रुपच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ यावेळात १० तारखेपर्यंत सुरू राहील असे नमूद करण्यात आले.लॉकडाउनच्या काळात एकत्र आलेल्या महिलांनी व्यवसाय सुरू करावा म्हणून या ग्रुपची निर्मिती झाली.

बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_________