जिरेवाडी ग्रामपंचायत मतदार यादी शहरी भागातील लोकांची नावे... | उद्या ग्रामीण भागाचे मतदान तर....शहरातील लोकांची मतदार यादीला नावे शहरातील लोक मतदान करणार !! निवडणूक विभागाचा भोंगळा कारभार ...
ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान उद्या होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची मतदानाची धामधूम सुरू असतानाच बीड जिल्ह्यातील जिरेवाडी, रामनगर सह अनेक गावातील मतदार याद्यां मध्ये बाहेर गावच्या लोकांची मतदार यादी मध्ये नावे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.
जिरेवाडी ग्रामपंचायत मतदार यादी शहरी भागातील लोकांची नावे...
उद्या ग्रामीण भागाचे मतदान तर....शहरातील लोकांची मतदार यादीला नावे शहरातील लोक मतदान करणार !! - निवडणूक विभागाचा भोंगळा कारभार ...
ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान उद्या होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची मतदानाची धामधूम सुरू असतानाच बीड जिल्ह्यातील जिरेवाडी, रामनगर सह अनेक गावातील मतदार याद्यां मध्ये बाहेर गावच्या लोकांची मतदार यादी मध्ये नावे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.या मतदान प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या मतदार याद्या घोळ केलेला दिसत आहेे. पुणे शहर बीड शहर सिरसाळा,अशा बाहेरील लोकाची व नातेवाईक आप्तेष्टांची नावे यादीमध्ये लावण्यात आली आहेत. उद्या होऊ घातलेल्या मतदान प्रक्रियेवर याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तवली आहे.
बीड येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे लिखित स्वरूपात तक्रार देऊनही त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने घेतले नाही. गावातील मतदारांनी व निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला आहेे.
उद्या सकाळी ज्या वेळेस मतदान होईल त्यावेळेस मतदार खरा खोटा आहे हे सिद्ध करावे लागणार तरच मतदानाचा हक्क बजावता येईल अशीही चर्चा या गावांमध्ये आहे. या मतदार याद्यांच्या घोळ प्रकरणी कानावर हात ठेवलेली दिसत आहेत. कुठलीतरी राजकीय शक्ती या पाठीमागे असल्याची चर्चा या गावांमध्ये आहे. निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी या गावांमध्ये थांब इंप्रेशन मशीन व आधार मतदान हे दोन्ही जुळवून मतदान घ्यावे अशी मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
___________