अरविंद मोरे यांची चार दिवसीय  पत्रकार कार्यशाळा पूर्ण...| पत्रकारांसाठी 'संविधान प्रचारक पत्रकार कार्यशाळा' संपन्न...

लोकमुद्रा संस्था व दैनिक प्रजापत्र यांच्या वतीने पत्रकारांसाठी संविधान प्रचारक कार्यशाळा झूम ऍपच्या माध्यमातून पार पडली. पत्रकारांना संविधानिक मूल्यांची ओळख व्हावी यासाठी लोकमुद्रा संस्था व दैनिक प्रजापत्र यांनी चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

अरविंद मोरे यांची चार दिवसीय  पत्रकार कार्यशाळा पूर्ण...| पत्रकारांसाठी 'संविधान प्रचारक पत्रकार कार्यशाळा' संपन्न...
Arvind More's four day journalist workshop completed ... | 'Constitution Pracharak Journalist Workshop' for journalists ...

अरविंद मोरे यांची चार दिवसीय  पत्रकार कार्यशाळा पूर्ण...

पत्रकारांसाठी 'संविधान प्रचारक पत्रकार कार्यशाळा' संपन्न...

पिंपरी : लोकमुद्रा संस्था व दैनिक प्रजापत्र यांच्या वतीने पत्रकारांसाठी संविधान प्रचारक कार्यशाळा झूम ऍपच्या माध्यमातून पार पडली. पत्रकारांना संविधानिक मूल्यांची ओळख व्हावी यासाठी लोकमुद्रा संस्था व दैनिक प्रजापत्र यांनी चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये  संविधान निर्मितीचा इतिहास या विषयावर प्रा. प्रकाश पवार, संविधानाची प्रास्तविका याविषयावर नागेश जाधव, न्याय-स्वातंत्र्य-समता -बंधुता याविषयावर विनिता सिंग यांनी मांडणी केली. त्यात *अखिल युवा पत्रकार संघ चे राष्ट्रीय सचिव यांनी चार दिवसीय पत्रकार कार्यशाळा यशस्वी पूर्ण केली. त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

समारोप सत्रात 'संविधानिक पत्रकारिता' या चर्चासत्रात जेष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली नितीन ब्रह्मे व अश्विनी सातव - डोके या पत्रकारांनी मांडणी केली. 

महाराष्ट्रभरातून 45 पत्रकार यात सहभागी झाले होते. कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी दैनिक प्रजापत्र संपादक सुनील क्षीरसागर, संजय मालानी तर लोकमुद्रा संस्थेचे सागर भालेराव, कल्याणी माणगावे, रशीद माणियार, संदीप आखाडे यांनी विशेष मेहनत घेतली.

पिंपरी

प्रतिनिधी - आत्माराम काळे

__________