कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार नितीन पवार यांचे कोविड योध्दयांना आरोग्य किट वाटप करून अनोख्या पध्दतीने वाढदिवस केले साजरे...

कौतुकास्पद उपक्रम कळवण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार नितीन पवार यांचे कोविड योध्दयांना आरोग्य किट वाटप करून वाढदिवस  साजरे केले. 

कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार नितीन पवार यांचे कोविड योध्दयांना आरोग्य किट वाटप करून अनोख्या पध्दतीने वाढदिवस केले साजरे...
Kalvan taluka NCP celebrates MLA Nitin Pawar's birthday in a unique way by distributing health kits to covid warriors

कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार नितीन पवार यांचे कोविड योध्दयांना आरोग्य किट वाटप करून अनोख्या पध्दतीने वाढदिवस केले साजरे... 
 

कळवण : कौतुकास्पद उपक्रम कळवण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार नितीन पवार यांचे कोविड योध्दयांना आरोग्य किट वाटप करून वाढदिवस  साजरे केले. 
  कोविड योध्यांप्रती सामाजिक बांधिलकी म्हणून कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार नितीन पवार यांचे कोविड योध्दयांना आरोग्य किट वाटप करण्यात आले. 
कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन(एटी) पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी
श्री पंकज पाचपिंड यांच्यासह सहकाऱ्यांनी बुधवारी कळवण शहरातील कोविड-१९ योद्धे असलेल्या कळवण पोलीस कर्मचारी ,उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी व नगरपंचायत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना संरक्षणार्थ आरोग्य किट वाटप केले. यात प्रामुख्याने सॅनिटायझर, ऑक्सीमीटर, वेपोरायझर स्टिमर, फेसशील्ड किटचा समावेश आहे.
करोना च्या महामारीत जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कार्य करणाऱ्यांचा अशा अभिनव व उपयुक्त कल्पनेने पंकज राव व टीम अभिनंदनास पात्र ठरत आहे. नेत्याचा वाढदिवस या लाखमोलाच्या उपक्रमाने साजरा केला  त्याबद्दल समाजातून खरोखरच या कार्याचे कौतुक केले जात आहे. 
यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद जी वाघ यांनी याबाबतीत गौरवोद्गार काढून या उपक्रमाचे कौतुक करतांनाच आमच्या पोलीस बांधवांसाठी तुम्ही दिलेली ही अनमोल भेट स्मरणात राहणारी ठरते असे सांगितले. 
या उपक्रमाप्रसंगी रविंद्र बाबा देवरे,धनंजय आण्णा पवार,राजेंद्र भामरे,भूषण पगार आदी मान्यवर उपस्थित होते.

कळवण 

प्रतिनिधी - मनोहर गायकवाड 

_________

Also see : पुणे साउंड, इलेक्ट्रिकल्स, जनरेटर, इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनचा मूकमोर्चा व धरणे आंदोलन

https://www.theganimikava.com/pune-vendor-associations-muk-morcha-and-agitation