मृत्यूनंतर देखील हाल, कोरोना रुग्णांचे मृतदेह फरफटत टेम्पोत भरले

कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह फरपटत घेऊन जात असताना चे व्हिडिओ व्हायरल

कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह फरपटत घेऊन जात असताना चे व्हिडिओ व्हायरल

कोलकत्ता दिनांक 13-06-2020
जगभरात पसरलेल्या कोरोना ने आता भारतातही हा कार घातला आहे भारतातील संख्या आज तीन लाखांच्या घरात पोचली आहे आजच्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात जवळपास 11000 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे या वाढीसह देशातील कोरोना बाधितांची संख्या 2लाख 97 हजार 535 वर पोचली आहे. त्याचप्रमाणे गेल्या चोवीस तासात 396 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातील एकूण कोरोना बळींची संख्या आठ हजार 498 इतकी झाली आहे आणि यामध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे आणि अशा या वातावरणात अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. कोरोनाग्रस्त यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांनी देखील पाठ फिरवल्या च्या घटना घडत आहेत. त्यामुळे मृतदेहांचे हाल होत आहे. असाच एक पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता मधील भयंकर प्रकार व्हिडिओमध्ये कैद करून सर्वांसमोर आणला गेला आहे. भाजपचे नेते कैलाश विजयगिर्य यांनी हा व्हिडीओ शेअर केल्याचे सांगण्यात आले आहे