महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बँक सुरु आणि बंद होण्याच्या वेळेत बदल

देशात कोरोनाची दुसरी लाट हाहा:कार माजवतेय. रोज नव्याने हजारो रुग्ण आढळत आहेत. संसर्ग होऊ नये म्हणून विविध राज्यांनी कठोर निर्णय घेतले आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बँक सुरु आणि बंद होण्याच्या वेळेत बदल
maharashtra bank

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बँक सुरु आणि बंद होण्याच्या वेळेत बदल

Changes in opening and closing times of banks in many states including Maharashtra

देशात कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवतेय. रोज नव्याने हजारो रुग्ण आढळत आहेत. संसर्ग होऊ नये म्हणून विविध राज्यांनी कठोर निर्णय घेतले आहे. 

देशात कोरोनाची दुसरी लाट हाहा:कार माजवतेय. रोज नव्याने हजारो रुग्ण आढळत आहेत. संसर्ग होऊ नये म्हणून विविध राज्यांनी कठोर निर्णय घेतले आहे. तसेच विविध संस्थासुद्धा कोरोना प्रतिबंधक नियम पाळत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अनेक राज्यानी बँकेच्या व्यवहारासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील बँकांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच चेक क्लियरन्सचं काम जालणार आहे. हा निर्णय 23 एप्रिलपासून लागू होईल. तसे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये सर्व बँक बंद आणि सुरु होण्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. येथे सकाळी 10 पासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतच बँक सुरु राहतील. तसेच या काळात बँकेमध्ये कमीत कमी सेवा दिली जाईल. यामध्ये चेक क्लियरिंग, सराकारी व्यवहार, ट्रान्झिन्स तसेच इतर तत्सम सेवांचा समावेश आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने बँकेचे सर्व काम फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर बाकीचे 50 टक्के कर्मचारी हे घरून काम करतील. सध्या बँकेच्या कामकाजामध्ये अनेक बदल करण्यात आलेले असले.

तरी बँकांमध्ये ATM, सिक्योरिटी डिपॉझिट, डेटा ऑपरेशन, सायबर सिक्योरिटी, क्लियरिंग हाऊस, बैंक ट्रॅजेरी असे  सर्व व्यवहार पहिल्यासारखेच नॉर्मल पद्धतीने पार पाडले जातील. बँकेचे हे आदेश 22 एप्रिल ते 15 मेपर्यंत लागू राहतील. तसेच सरकारच्या आदेशानुसार आगामी काळात नियमांचा कालावधी वाढवलासुद्धा जाऊ शकतो.

दरम्यान, देशात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे यूएफबीयू ने आईबीएला एक निवेदन दिले आहे. यामध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत सार्वजनिक कामाचे तास कमी करावेत.

अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच कामाचे हे तास प्रतिदवस तीन तासापर्यंत आणावेत, अशी मागणीसुद्धा यूएफबीयूने केली आहे.