फेरीवाल्यांवरील कारवाई पुढे ढकलण्याची मनसेची मागणी...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यत पदपथावर अतिक्रमण करणारे फेरीवाले, विक्रेत, टपरी धारक इतर व्यावसायिक यांच्यावर विशेष फेरीवाला पथकामार्फत कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

फेरीवाल्यांवरील कारवाई पुढे ढकलण्याची मनसेची मागणी...
Manse demands postponement of action against peddlers...

फेरीवाल्यांवरील कारवाई पुढे ढकलण्याची मनसेची मागणी...

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यत पदपथावर अतिक्रमण करणारे फेरीवाले, विक्रेत, टपरी धारक इतर व्यावसायिक यांच्यावर विशेष फेरीवाला पथकामार्फत कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र आगामी दिवाळी सण लक्षात घेता हि कारवाई १५ तारखेनंतर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.  

      पालिकेमार्फत १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान विशेष फेरीवाले पथक नेमुन फेरीवाल्यांवर  कारवाई करण्याचे ठरवले आहे. सद्यस्थितीत लॉकडॉउनमुळे स्थानिक रहिवासी यांना मोठया प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामध्ये भरपूर लोकांच्या नोकर्यांही गेल्या आहेत. ऐन सणासुधीत ही कारवाई करणे हे चुकीचे असून भरपूर फेरीवाले आणि इतर विक्रेत्यांचा उदरनिर्वाह ह्यामार्फत होणार आहे. पालिकेच्या कारवाईला मनसेचा विरोध नाही परंतु ही कारवाई ज्यावेळी घेतली ती वेळ योग्य नाही. तरी ही कारवाई १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत करावी अशी मागणी मनसेने केली आहे.

        तसेच होणाऱ्या या कारवाईमध्ये स्थानिक फेरीवाले व परप्रांतीय फेरीवाले यांचा विचार करूनच योग्य ती कारवाई करावी. त्यावेळी मनसे पक्ष हा आपला सोबत असेल. तरी कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या परिस्थितीचा योग्य तो विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची मागणी मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________