एमपीएससी परीक्षेत विजय लाड राज्यात प्रथम.....

एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला . महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 'महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा'मधील लिपिक-टंकलेखन पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या अंतिम निकाल घोषित करणात आला.

एमपीएससी परीक्षेत विजय लाड राज्यात प्रथम.....

एमपीएससी परीक्षेत विजय लाड राज्यात प्रथम.....

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 'महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा'मधील लिपिक-टंकलेखन पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या अंतिम निकालात सांगलीतील विजय लाड हे राज्यात व मागासवर्गीयातून प्रथम आले आहेत. महिलांमध्ये अमरावतीच्या प्राजक्‍ता चौधरी ह्या राज्यात प्रथम आल्या llआहेत.

या पदांच्या परीक्षेचा अंतिम निकाल लवकराल लवकर जाहीर करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून होत होती. त्यानंतर आज आयोगाने निकाल जाहीर केल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. आयोगातर्फे दि. 6 व 10 ऑक्‍टोबर 2019 रोजी लिपिक-टंकलेखन मराठी व इंग्रजी या संवर्गातील एकूण 179 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.

या परीक्षेसाठी संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेले दावे निकालासाठी विचारात घेऊन निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सांगली जिल्ह्यातील विजय लाड हे राज्यात व मागासवर्गीयातून प्रथम, तर महिलांमध्ये अमरावती जिल्ह्यातील प्राजक्‍ता चौधरी प्रथम आल्याचे आयोगाने आज घोषित केले.