परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध ?

परमबीर सिंग हे अंडरवर्ल्डमधील काही गुंडांच्या सेटिंगचं काम पाहत असत. क्राईम ब्रांचमार्फत ते डील करत होते, असा आरोप अनुप डांगे यांनी केला होता .

परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध ?
mumbai police news

परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध ?

Parambir Singh's relationship with the underworld ?

परमबीर सिंग हे अंडरवर्ल्डमधील काही गुंडांच्या सेटिंगचं काम पाहत असत. क्राईम ब्रांचमार्फत ते डील करत होते, असा आरोप अनुप डांगे यांनी केला होता .

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग  यांच्याविषयीची आणखी एक चौकशी सुरु झाली आहे. पोलिस महासंचालक संजय पांडे या प्रकरणाची चौकशी करुन आपला अहवाल सादर करतील. गावदेवी पोलिस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक अनुप डांगे  यांच्या आरोपांनंतर ठाकरे सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या अनुप डांगे यांनी काही काळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री यांना एक पत्र लिहून परमबीर सिंग यांच्यावर अंडरवर्ल्डशी मैत्री आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. अनुप डांगे यांच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये एका पबवर छापा टाकताना पबचे मालक जीतू निवलानी यांनी परमबीरसिंग यांच्याशी संबंध असल्याची धमकी दिली होती.

विरोधात पुरेसे पुरावे नसले तरी केस तयार केली म्हणून संबंधित व्यावसायिकाविरुद्ध खटला भरण्यासाठी विभागीय कार्यवाही करत असताना आपल्याला निलंबित करण्यात आले होते, असा दावा अनुप डांगे यांनी केला. अनुप डांगे यांच्या दाव्यानुसार त्यांना पब मालकाच्या सांगण्यावरुन परमबीर सिंग यांनीच अडकवलं होतं.

परमबीर सिंग हे अंडरवर्ल्डमधील काही गुंडांच्या सेटिंगचं काम पाहत असत. क्राईम ब्रांचमार्फत ते डील करत होते, असा आरोप अनुप डांगे यांनी केला होता. परमबीर सिंग यांच्या जवळच्या एका व्यक्तीने त्यांना पुन्हा नोकरीवर रुजू करण्यासाठी 2 कोटींची मागणी केल्याचाही दावा डांगेंनी केला होता.

सध्या अनुप डांगे यांना गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये पुन्हा रुजू करण्यात आलं आहे. अनुप डांगे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने डीजी संजय पांडे यांना दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या वतीने परमबीर सिंग यांच्याविषयीचे चौकशीचे हे दुसरे प्रकरण आहे, ज्यामध्ये तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वी अँटिलिया टेरर प्रकरणात तपासाची दिशाभूल केल्याबद्दल परमबीर सिंग यांच्याविरोधत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.