मुंबई विद्यापीठाची पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू ; तसेच प्रथम प्रवेश प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ४ ऑगस्टला....

मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

मुंबई विद्यापीठाची पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू ; तसेच प्रथम प्रवेश प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ४ ऑगस्टला....

मुंबई विद्यापीठाची पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू ; तसेच प्रथम प्रवेश प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ४ ऑगस्टला....

मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिली गुणवत्ता यादी ४ ऑगस्टला प्रसिद्ध होणार असून मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थांना प्रथम विद्यापीठाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. २२ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थांना विद्यापीठाकडे ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तर पहिली गुणवत्ता यादी ४ ऑगस्टला जाहीर होणार आहे.

विद्यार्थांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी शहरी भागात ऑनलाइन प्रवेश पद्धतीने प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिह्यातील महाविद्यालयांना प्रवेशासाठी ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेता येणार आहेत. विद्यार्थ्यांना हमीपत्र अर्ज भरून कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी हमीपत्राच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे तात्पूरते प्रवेश निश्चित करून मूळ कागदपत्रांच्या प्रती सादर केल्याकर अंतिम प्रवेश दिला जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्यास प्रवेशासाठीच्या तांत्रिक सुविधेसाठी अडचणी आल्यास त्यांने त्याच्या नजीकच्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. वेबसाइट - mum.digitaluniversity.ac हेल्पलाईन क्रमांक - ८४११८६०००४

असे असेल प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक
अर्जविक्री - २४ जुलै ते ४ ऑगस्टनंतर
 प्रवेश पूर्व ऑनलाईन अर्ज - २२ जुलै ते ४ ऑगस्ट
प्रवेशपूर्व अर्ज जमा करणे - २७ जुलै ते ४ ऑगस्ट
पहिली गुणवत्ता यादी - ४ऑगस्ट, सायंकाळी ७ वा.
 कागदपत्रे पडताळणी, फी भरणे - ५ ते १० ऑगस्ट
दुसरी गुणवत्ता यादी - १० ऑगस्ट, सायंकाळी ७ वाजता.
कागदपत्रे पडताळणी, फी भरणे - ११ ते १७ ऑगस्ट
 तिसरी गुणवत्ता यादी- १७ ऑगस्ट, सायंकाळी ७ वाजता.
 कागदपत्रे पडताळणी, फी भरणे - १८ ते २१ ऑगस्ट

५६ हजार १२९ विद्यार्थांनी भरले अर्ज
मुंबई विद्यापीठाने १८ जुलैपासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी सुरू केली आहे. आतापर्यंत ६७ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून विविध अभ्यासक्रमांसाठी ५६ हजार १२९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नोंदणी करताना काही अडचणी आल्यास विद्यार्थांना ०२०-६६८३४८२१ या हेल्पलाईन क्रमांकाकर संपर्क साधता येणार.

कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याची सुविधा
विद्यापीठाने यावर्षी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac या वेबसाईटवरील click on-Mumbai University Pre Admission online Registration २०२०- २१ या लिंकवर क्लिक करावे.