बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी मुरबाड तालुक्यातील सर्व व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद !
केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात शेतकरी, शेत मजुर व विविध शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारलेला आहे त्याला पाठिंबा म्हणुन मुरबाड तालुका-शहरातील सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी उस्पुर्तपणे बंद पुकारला.
बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी मुरबाड तालुक्यातील सर्व व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद !
केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात शेतकरी, शेत मजुर व विविध शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारलेला आहे त्याला पाठिंबा म्हणुन मुरबाड तालुका-शहरातील सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी उस्पुर्तपणे बंद पुकारला. बंदकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालुन महामहीम राष्ट्रपतींना मुरबाड तालुका तहसिलदारांना मार्फत सदरचे काळे कायदे त्वरित मागे घेवुन शेतकऱ्यांना गुलामीकडे जाण्यापासुन वाचवावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी रिपाई सेक्युलरचे रवींद्र चंदने, शिवसेनेचे रामभाऊ दळवी, कांतीलाल कंटे, राम दुधाळे, काँग्रेसचे चेतनसिंह पवार, कृष्णकांत तुपे, योगेश गुजर, राष्ट्रवादीचे राजाभाऊ सासे, दिपक वाघचौडे, प्रहारचे शरद पाटील, युवक काँग्रेसचे धनाजी बांगर, वैशाली घरत, संध्या कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते. ह्या कृषी कायद्यान्वये बळीराजाची जमीन मोठ्या उद्योगपतीनां जाचक कराराच्या माध्यमातुन देण्यात येतील व पिकांसाठी कुठल्याही पध्दतीची किमान आधारभुत किंमत न देता पीक खरेदी केले जाणार आहे असे मत काँग्रेस पक्षाचे चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले.
सदरचे कायदे हे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामीकडे ढकलण्याचे काम केले जाणार आहे असे यावेळी रिपाई सेकुल्यरचे रविंद्र चंदने यांनी प्रतिपादन केले. महाविकास आघाडी सरकारचे सर्व प्रमुख घटक पक्ष व पाठिंबा असलेल्या सर्व संघटना ह्या शेतकऱ्यांसोबत असल्याचे यावेळी शिवसेनेच्या रामभाऊ दळवी यांनी मत व्यक्त केले.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
___________