कारवाई झाली तरी बेहत्तर, पण नारळी पौर्णिमा साजरी करणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून कोणताही कार्यक्रम करण्यास बंदी आहे.

कारवाई झाली तरी बेहत्तर, पण नारळी पौर्णिमा साजरी करणार
narali purnima 2021 event

कारवाई झाली तरी बेहत्तर, पण नारळी पौर्णिमा साजरी करणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून कोणताही कार्यक्रम करण्यास बंदी आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण पोलिसांनी मनसैनिकांना 149 ची नोटीस बजावली आहे. मात्र, मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्याचा चंग बांधला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून कोणताही कार्यक्रम करण्यास बंदी आहे. तरीही मनसेकडून दादरमध्ये नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.(narali purnima 2021 event)

मुंबईत सध्या सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोक जमण्यास बंदी आहे. मनसेच्या या कार्यक्रमालाही गर्दी होऊ शकते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मनसेचे शाखा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या आहेत. यानंतरही मनसेचे कार्यकर्ते नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम जोशात साजरा करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आज दादर परिसरात मनसे आणि पोलीस आमनेसामने येण्याची शक्यता आहे.


कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेच्या सणाला विशेष महत्व असतं. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ, श्रीफळ अर्पण करतात आणि पूजा करतात. त्यानंतर मासेमारीसाठी होड्या पुन्हा समुद्रात नेल्या जातात. मात्र, आता यानिमित्ताने मुंबईतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वीच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत बैलगाडा शर्यत भरवून सरकारी आदेशाचे उल्लंघन केले होते. याप्रकरणी पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह 41 जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते. गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील झरे गावात भव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. मात्र, पोलिसांनी या शर्यतीसाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर पोलीस गोपीचंद पडळकर यांच्या फार्म हाऊसशेजारी शर्यतीसाठी तयार करण्यात आलेल्या मैदानावर लक्ष ठेवून होते.(narali purnima 2021 event)

पडळकर समर्थकांनी स्पर्धेचे ठिकाण बदलत जवळच्याच भागात रातोरात नवी धावपट्टी तयार केली. त्यानंतर पहाटेच्या वेळेत बैलगाडा शर्यत पार पडली होती.