गढी महाविद्यालयात "राष्ट्रीय शिक्षण दिवस" साजरा...

कला व विज्ञान महाविद्यालय शिवाजीनगर गढी येथे भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्मदिन ११ नोव्हेंबर २०२० हा "राष्ट्रीय शिक्षण दिवस "म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित करण्यात आला.सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास कदम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

गढी महाविद्यालयात "राष्ट्रीय शिक्षण दिवस" साजरा...
Gadhi College celebrates "National Education Day" ...

गढी महाविद्यालयात "राष्ट्रीय शिक्षण दिवस" साजरा... 

कला व विज्ञान महाविद्यालय शिवाजीनगर गढी येथे भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद यांचा जन्मदिन ११ नोव्हेंबर २०२० हा "राष्ट्रीय शिक्षण दिवस "म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित करण्यात आला.सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास कदम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.याप्रसंगी बोलताना त्यांनी मौलाना अबूल कलाम आजाद यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला.

यावेळी त्यांनी असे प्रतिपादन केले की,मौलाना अबूल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहेत.परंतु याशिवाय ते नामवंत लेखक, कवी पत्रकार व थोर स्वतंत्रसेनानी होते.शिक्षण मंत्री म्हणून कार्य करत असताना त्त्यांनी शिक्षण क्षेत्रात विकासात्मक अमुलाग्र बदल केले.यू.जी.सी.,आय. आय.टी इ .ची स्थापना  त्यांनी केलेली आहे. त्यांनी आयुष्यभर  हिन्दु- मुस्लीम एकतेसाठी कार्य केले व एकात्मतेतून  राष्ट्रविकास करण्याचे धोरण अवलंबिले.            

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.राणी जाधव,सुत्रसंचालन प्रा.हिरा पोटकुले तर आभार प्रा.डॉ.कलंदर पठाण यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.हा कार्यक्रम कोव्हिड-19 चे सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे पालन करुन व सामजिक अंतर राखूण घेण्यात आला.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

___________