दिवाळीच्या तोंडावर तेलाचे भाव वाढले : ज्ञानेश्वर कवठेकर नेते वंचित बहूजन आघाडी बीड...
बीड कोरोना महामारी चे संकट जगभर असतांना त्याचबरोबर महागाईचे संकट असतानाच तोंडावर आलेल्या दिवाळीची चिंता सर्वसामान्यांना लागली आहे. सणासुदीच्या दिवसात तेल दरवाढीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. आधीच कोरोना महामारी मुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत हातावर पोट असणाऱ्यांची दिवाळी यंदा अंधारातच जाण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या दिवसात हातात पैसे नाहीत आणि त्यामध्ये तेल दरवाढीची भर पडली आहे.

दिवाळीच्या तोंडावर तेलाचे भाव वाढले : ज्ञानेश्वर कवठेकर नेते वंचित बहूजन आघाडी बीड...
बीड कोरोना महामारी चे संकट जगभर असतांना त्याचबरोबर महागाईचे संकट असतानाच तोंडावर आलेल्या दिवाळीची चिंता सर्वसामान्यांना लागली आहे. सणासुदीच्या दिवसात तेल दरवाढीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे आधीच कोरोना महामारी मुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत हातावर पोट असणाऱ्यांची दिवाळी यंदा अंधारातच जाण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या दिवसात हातात पैसे नाहीत आणि त्यामध्ये तेल दरवाढीची भर पडली आहे.
स्वयंपाक करण्यासाठी तेलाची गरज लागते त्यामुळे तेलाची ची खरेदी ही करावीच लागते पामतेल सोयाबीन तेल शेंगदाणा तेल सूर्यफूल तेल या तेलाचे भाव १५ ते २० रुपयांनी वाढले आहेत. तर सर्वसामान्यांनी दिवाळी कशी साजरी करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. जगभरातील करुणा महामारी च्या संकटातुन कसाबसा सर्वसामान्य माणूस बाहेर पडला होता गेल्या ९ ते १० महिन्यापासून हाताला काम नाही रोजगार उपलब्ध नाही आणि त्यात यात काही दिवसावर दिवाळी आली आहे. तेलाबरोबर विविध किराणा वस्तूंचे भाव वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य परेशान आहेत त्यांना असं वाटत आहे की यंदाच्या दिवाळीच्या फराळाचा आस्वाद आपल्या कुटुंबातील लहान बाळांना किंवा मुलांना मिळतो का नाही हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. तरी शासनाने व प्रशासनाने या तेल वाढीचा गांभीर्याने विचार करून सर्वसामान्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
___________