प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे म्हसा याञेच भिजत घोंगड, व्यापारी अडचणीत 

दरवर्षी पौष पौर्णिमेला सुरु होणारी मुरबाडची म्हसा याञा मागच्या वर्षात कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती . या वर्षी ही याञा सुरळीत पार पडेल अशी स्थिती असतांना पुन्हा कोरोनाचा दुसरा अवतार ओमायक्राॅनने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली.

प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे म्हसा याञेच भिजत घोंगड, व्यापारी अडचणीत 
omicron cases in maharashtra

प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे म्हसा याञेच भिजत घोंगड, व्यापारी अडचणीत

दरवर्षी पौष पौर्णिमेला सुरु होणारी मुरबाडची म्हसा याञा मागच्या वर्षात कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती . या वर्षी ही याञा सुरळीत पार पडेल अशी स्थिती असतांना पुन्हा कोरोनाचा दुसरा अवतार ओमायक्राॅनने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली.

मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:

 दरवर्षी पौष पौर्णिमेला सुरु होणारी मुरबाडची म्हसा याञा मागच्या वर्षात कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती . या वर्षी ही याञा सुरळीत पार पडेल अशी स्थिती असतांना पुन्हा कोरोनाचा दुसरा अवतार ओमायक्राॅनने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली असल्याने 17 जानेवारी पासून सुरु होणारी ही  याञा भरणार की नाही या संभ्रमावस्थेत व्यापारी असून , याञेची जबाबदारी पार पाडणारे तहसिलदार यांचे नेतृत्वाखालील प्रशासन व म्हसोबा मंदीर व्यावस्थापन समिती यांचा ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे.माञ याञा होणार की नाही याचा निर्णय होत नसल्याने व्यापारी वर्गात असंतोष पसरला आहे.(omicron cases in maharashtra)


               दोनशे ते अडीजशे वर्षाची परंपरा असलेली  मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील म्हसोबाची याञा महाराष्ट्रात प्रसिध्द आहेचं परंतू शेजारच्या गुजरात , राज्यस्थान , कर्नाटक , आंध्रप्रदेश , मध्यप्रदेश येथील व्यापारी देखील याञेला येत असतात.दरवर्षी पौष पौर्णिमेला सुरु होणारी याञा पंधरा दिवस चालते . याञेला हौसे गौसे नवसे सह लाखो भाविक हजेरी लावतात.या ठिकाणचा म्हसोबा देव नवसाला पावतो असा भक्तांचा विश्वास असून , नवस फेडण्यासाठी येणारे भक्तगण गळ लावतात. याञेत मनोरंजनासाठी तमाशाचे फड , आकाश पाळणी , मौत का कुआ , संगीताच्या तालावर नाचगाण्यांचे कार्यक्रम , असे विविध प्रकारचे करमणुकीचे खेळासह  घोंगडी , ब्लँकेट , सोलापुरी चादर , स्वेटर , भांड्याची दुकाने थाटली जातात . याञेतील आकर्षण म्हणजे बैल बाजार व येथे विक्रीसाठी आणले जाणारे खिल्लारी बैल व कोट्यावधींची होणारी उलाढाल . तसेच याञेतील प्रसिध्द मिठाई पैकी हातोळी , जांभूळ येणार याञेकरू हमखास खरेदी करतोच . या व्यवसायातून देखील लाखोंची कमाई होत असते.

          मागील वर्षी कोरोना मुळे ही याञा रद्द करण्यात आली होती . माञ यावर्षी याञा भरेल असे वातावरण असतांना पुन्हा कोरोनाचा दुसरा अवतार ओमायक्राॅनने डोके वर काढल्याने याञा होणार की नाही याचा निर्णय प्रशासन व मंदीर व्यवस्थापन समिती जाहीर करत नाही . तो पर्यंत व्यापा-यासह सर्वच संभ्रमावस्थेत आहेत . याञा 17 जानेवारीला सुरु होणार असली तरी याञेची जबाबदारी तहसिलदार व म्हसोबा मंदीर व्यावस्थपन यांच्यावर असून त्यांचा निर्णय येण्यास उशीर होत असल्याने सर्वञ नाराजीचा सुर उमटत आहे.
 

( म्हसा याञेवर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी मिटींग घेतली जाणार आहे . परंतू याञा होणार नसल्याचे तहसिवदार संदीप आवारे यांनी सांगीतले.)( म्हसा याञेबाबत तहसीलदार यांच्याशी चर्चा करुन ठरवले जाईल .दशरथ ( बाळु ) पष्टे . अध्यक्ष म्हसोबा मंदीर व्यवस्थापन समिती)(omicron cases in maharashtra)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/