ऑनलाईन शिक्षण काळात प्रथम वर्षात शिक्षण घेतलेले विद्यार्थी द्वितीय वर्षात वसतिगृह प्रवेशासाठी पात्र

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश नियमावली नुसार शैक्षणिक सत्राच्या पहिल्या वर्षात प्रवेशीत विद्यार्थी पात्र असतो, मध्यंतरीच्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक सत्राच्या दुसऱ्या वर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जात नाही.

ऑनलाईन शिक्षण काळात प्रथम वर्षात शिक्षण घेतलेले विद्यार्थी द्वितीय वर्षात वसतिगृह प्रवेशासाठी पात्र
online education

ऑनलाईन शिक्षण काळात प्रथम वर्षात शिक्षण घेतलेले विद्यार्थी द्वितीय वर्षात वसतिगृह प्रवेशासाठी पात्र

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश नियमावली नुसार शैक्षणिक सत्राच्या पहिल्या वर्षात प्रवेशीत विद्यार्थी पात्र असतो,  मध्यंतरीच्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक सत्राच्या दुसऱ्या वर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांना  वसतिगृहात प्रवेश दिला जात नाही.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

मुंबई दि. 09 : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश नियमावली नुसार शैक्षणिक सत्राच्या पहिल्या वर्षात प्रवेशीत विद्यार्थी पात्र असतो,  मध्यंतरीच्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक सत्राच्या दुसऱ्या वर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांना  वसतिगृहात प्रवेश दिला जात नाही, मात्र कोविड काळात जे विद्यार्थी महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेऊन ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत होते व त्या काळात वसतिगृहे बंद होती, यावर्षी ते शैक्षणिक सत्राच्या द्वितीय वर्षात प्रवेशित झाल्याने त्यांची वसतिगृहात अर्ज करण्याची पहिलीच संधी असूनही वरील नियमामुळे त्यांचा विचार केला गेला नसता, म्हणून मध्यंतरीचा नियम शिथिल करून जे विद्यार्थी सन 2020-21 मध्ये प्रथम वर्षात शिकत होते ते आता दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असतील तरी त्यांनी वस्तीगृह प्रवेशासाठी अर्ज केल्यास त्यांचा गुणवत्ता यादी समावेश करून गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात यावा असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.(online education)

ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार यासंदर्भातील शासन परिपत्रक उद्या (दि. 10) रोजी निर्गमित करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मागील काळात कोविड विषयक निर्बंधांमुळे शाळा-महाविद्यालये बंद होती व ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते. त्यामुळे याकाळात सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे बंद होती.

दरम्यान आता शाळा - महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ऑनलाईन काळात प्रथम वर्षाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षासाठी वसतिगृह प्रवेश मिळण्यास मध्यंतरीच्या अटीमुळे बाधा येत होती. धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना आता द्वितीय वर्षात गुणवत्तेनुसार वसतिगृहात थेट प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.(online education)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link