माकुणसार येथे अवयव दान निमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

जगदोध्दारक श्री दत्त मंदिर माकुणसार, एकलव्य सेवा संघ आणि मेडिकल प्रॅक्टिशनल असोसिएशन द्वारा आयोजित एक अनोखी संध्याकाळ हा कार्यक्रम श्री दत्त मंदिर माकुणसारच्या कै.शांतीबाई सखाराम पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला.

माकुणसार येथे अवयव दान निमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
organ donation program

माकुणसार येथे अवयव दान निमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

जगदोध्दारक श्री दत्त मंदिर माकुणसार, एकलव्य सेवा संघ आणि मेडिकल प्रॅक्टिशनल असोसिएशन द्वारा आयोजित एक अनोखी संध्याकाळ हा कार्यक्रम श्री दत्त मंदिर माकुणसारच्या कै.शांतीबाई सखाराम पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला.

रविंद्र घरत:

जगदोध्दारक श्री दत्त मंदिर माकुणसार, एकलव्य सेवा संघ आणि मेडिकल प्रॅक्टिशनल असोसिएशन द्वारा आयोजित एक अनोखी संध्याकाळ हा कार्यक्रम श्री दत्त मंदिर माकुणसारच्या कै.शांतीबाई सखाराम पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात आज  आपल्याला अवयवदानाची गरज का आहे? ह्याविषयी सखोल मार्गदर्शन केले डॉ. गीता राजू नेत्ररोग तज्ञ आणि डॉक्टर सूर्या राजू अध्यक्ष मेडिकल प्रॅक्टिशनल असोशियन पालघर यांनी नेत्रदान विषयी सखोल मार्गदर्शन केले. नेत्र दानाने काय क्रांती होऊ शकते ते प्रात्यक्षिकासह दाखवून दिले. डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनात आपले अनुभव व्यक्त केले. त्यांंनी रक्तदान व अवयव दान गरज स्पष्ट केली त्यांच्या प्रेरणेनेे  कार्यक्रमास सन्मानीय  पुरुषोत्तम पवार सर वसई यांच्यासारख्या वक्ता लाभला.(organ donation program)
त्यांनी आपल्या विनोदी शैलीत मार्गदर्शन करून श्रोत्यांना खिळवून ठेवले .अनेक उदाहरणे देऊन अवयवदान आणि नेत्रदान याचे महत्त्व पटवून दिले तसेच देहदानाचे महत्व पटवून दिले. सर्व श्रोतावर्ग भारावून गेला होता .ह्या कार्यक्रमात पाच व्यक्तींनी देहदानाचे फॉर्म भरले व 45 जणांनी नेत्रदानाचे फॉर्म भरले.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून हरिचंद्र वझे गुरुजी  म्हणून लाभले. त्यांनी आपल्या भाषणात हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल  कार्यकर्त्यांचे कौतुक केले .पी टी पाटील सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व अवयवदानाची गरज स्पष्ट केली.
नितीन राऊत यांनी आपल्या अष्टपैलू सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमास रंगत आणली. सन्माननीय  अनंत कुडू यांनी पाहुण्यांचे आणि श्रोत्यांचे आभार मानून ही क्रांतिकारी चळवळ सुरू ठेवण्याचे निश्चित केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज म्हात्रे, अमोल पाटील, हेमंत पाटील ,गणेश पाटील, पीटी पाटील सर, चंद्रकांत पाटील, संदीप राऊत ,प्रमोद ठाकूर यांनी विशेष प्रयत्न केले .या कार्यक्रमात अनेक डॉक्टर नर्स शिक्षक उपस्थित होते अनेकांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले कार्यक्रम शांततेत व शिस्तीत पार पडला.(organ donation program)