संच मान्यतामध्ये दुरुस्ती करावी, पालघर कलाध्यापक संघाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन...

विद्यार्थ्यांच्या कला कौशल्य व सुप्तगुणांना वाव देण्याच्या उद्देशाने शालेय संच मान्यतामध्ये १९८१ च्या कर्मचारी सेवाशर्ती नियमावलीनुसार किमान अडीचशे विद्यार्थ्यांसाठी एक कला आणि क्रीडा शिक्षक स्वतंत्र देण्यात यावे.

संच मान्यतामध्ये दुरुस्ती करावी, पालघर कलाध्यापक संघाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन...
The set recognition should be amended, the statement of the Palghar Art Teachers Association to the District Collector...

संच मान्यतामध्ये दुरुस्ती करावी, पालघर कलाध्यापक संघाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन...

      विद्यार्थ्यांच्या कला कौशल्य व सुप्तगुणांना वाव देण्याच्या उद्देशाने शालेय संच मान्यतामध्ये १९८१ च्या कर्मचारी सेवाशर्ती नियमावलीनुसार किमान अडीचशे विद्यार्थ्यांसाठी एक कला आणि क्रीडा शिक्षक स्वतंत्र देण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन पालघर जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांना मंगळवारी देण्यात आले. 
       यावेळी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या पालघर जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष रुपेश वझे, उपाध्यक्ष महेंद्र पाटील, प्रीतम घरत, कार्यवाह नितीन जैतकर, कोषाध्यक्ष भास्कर खेडकर, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे कोअर कमिटी सदस्य प्रमोद पाटील, पालघर कलाध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल घरत उपस्थित होते. 
        जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक संवर्गातील पदासाठी संच मान्यतेच्या निकषानुसार कलाशिक्षक या पदावर अन्याय होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयामार्फत संच मान्यतेच्या निकषात बदल करण्या संदर्भातले नवीन बदल शासनास पाठविण्यात आले आहेत. सन २०१४-१५ मध्ये अनेक शिक्षक संचमान्यतेत नव्हते. इयत्ता पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी, इयत्ता नववी ते दहावी आणि इयत्ता अकरावी व बारावी असे वेगवेगळे गट असल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त होत होते.
        माध्यमिक शाळांना मंजूर करावयाच्या शिक्षक पद निश्चितीसाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे वेग वेगळे गट न दाखवता इयत्ता पाचवी ते दहावीचा एकच गट करून सरसकट ३५ विद्यार्थ्यांमध्ये एक पद कला शिक्षकाचे निश्‍चित करावे. याच धर्तीवर शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव शिक्षकांचे विशेष शिक्षक पद निश्चित करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

_______