पंकजा मुंडेही येऊ शकतात उमेदवार भाजप राष्ट्रवादीला देणार झटका...

मराठवाडा पदविधर विधान परिषद निवडणूक भाजप उमेदवाराचा घोळ चालूच पंकजा मुंडेही येऊ शकतात उमेदवार भाजप राष्ट्रवादीला देणार झटका विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांची निवडणूक जाहीर होऊन काही दिवस झाले. राष्ट्रवादीचा उमेदवारही जाहिर झाला नसला तरी संभाव्य उमेदवाराने संपूर्ण मतदार संघाची एक प्रचारफेरी पूर्ण केली आहे.

पंकजा मुंडेही येऊ शकतात उमेदवार भाजप राष्ट्रवादीला देणार झटका...
Pankaja Munde can also come Candidate BJP will give a blow to NCP ...

पंकजा मुंडेही येऊ शकतात उमेदवार भाजप राष्ट्रवादीला देणार झटका...

दि .७ /११/२०२० बीड : मराठवाडा पदविधर विधान परिषद निवडणूक भाजप उमेदवाराचा घोळ चालूच पंकजा मुंडेही येऊ शकतात उमेदवार भाजप राष्ट्रवादीला देणार झटका विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांची निवडणूक जाहीर होऊन काही दिवस झाले. राष्ट्रवादीचा उमेदवारही जाहिर झाला नसला तरी संभाव्य उमेदवाराने संपूर्ण मतदार संघाची एक प्रचारफेरी पूर्ण केली आहे. तरिही भाजपाने आपला उमेदवार अद्याप जाहीर केला नाही किंवा संभाव्य उमेदवार म्हणूनही कोणी पुढे आले नाही.

त्यामुळेच संशय वाढला आसून भाजपा राष्ट्रवादीला झटका देऊन माजी मंत्री पंकजताई मुंडे यांनाच उमेदवारी देऊ शकते. तसे झाले तर एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अटीतटीची होऊन राष्ट्रवादीला जडही जाऊ शकते. विधान परिषदेची निवडणूक जाहीर होऊन बरेच दिवस झाले, राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार माजी सदस्य सतिष चव्हाण यांनी गेल्या कित्येक महिन्यापासून आपला प्रचार सुरू केलेला आहे. निवडणूक जाहीर केल्या नंतरही त्यांनी मतदारसंघाची एक फेरी पूर्ण केली आहे. मात्र भाजपचा उमेदवार कोण? या बाबतचा संभ्रम अद्याप संपलेला नाही.

त्याच प्रमाणे काही नावांची चर्चा वृत्तपत्रात होत असली तरी ते राष्ट्रवादीशी सामना करायला तुल्यबळ वाटत नाहीत. आणि जिने या मतदारसंघावर कित्येक निवडणुकीत अधिराज्य गाजवले ती देशात सत्ता गाजवणारी भाजप ही निवडणूक इतकी सहज सोडेल असे वाटत नाही. त्यामुळेच उमेदवार जाहीर करतानाच भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्याची शक्यता वाटत आहे. बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीतही (केज मतदारसंघ) राष्ट्वादीचे जाहीर झालेले उमेदवारच फोडण्याची किमया भाजपने आणि तत्कालीन मंत्री असलेल्या पंकजताई मुंडे यांनी करून दाखवली. आणि दोन्ही जागा निवडूनही आणल्या होत्या. स्थनिक स्वराज्य संस्था मतदार संघाची जागा तर भाजपने राष्ट्रवादीच्या जबड्यातुन खेचून काढण्याचे कौशल्य पंकजाताई यांनी केले होते.

आता भाजपची सत्ता राज्यात नसली तरी भाजपची ताकद कमी झाली आणि मराठवाड्यातील भाजपचा करिष्मा संपला असे दाखवणारी कोणतीही गोष्ट मराठवाड्यात घडलेली नाही. कोरोनामुळे का असेना पण विद्यमान सत्ताधाऱ्यांनाही आपला संपर्क मराठवाड्यात ठेवता किंवा वाढवता आलेला नाही. त्यामुळे भाजप हा मतदारसंघ पराभूत मनोवृत्तीतून लढवण्याची शक्यता नाही. त्यामुळेच भाजप ही निवडणूक जिकण्यासाठीच लढणार आणि राष्ट्रवादीच्या तोंडाला फेस आणणार हे स्पष्ट आहे. भाजपच्या मराठवाड्याच्या नेत्या म्हणूनच पंकजताई वावरत असतात आणि मानल्याही जातात. विधानसभेतील पराभवामुळे आणि राज्यातील भाजप नेत्यांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे पंकजाताई नाराज असतीलही पण त्यामुळे त्या मराठवाडा मोकळा सोडतील असे समजण्याचे कारण नाही. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे गारुड मराठवाड्यावर आजूनही आहे असे म्हटले तरी ते चूक ठरणार नाही. स्व.गोपीनाथराव यांना आणि त्यानंतर पंकजाताई यांनाही संपूर्ण मराठवाड्याला प्रत्यक्ष मतदान करण्याची आतापर्यंत कधी संधी मिळालेली नाही. ते मराठवाड्याचे स्व.गोपीनाथराव यांच्या वरचे प्रत्यक्ष प्रेम कॅश करण्याचा प्रयत्न भाजप कडून केला जाऊ शकतो. त्यातच उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत (भाजप नेतृत्वाला अनपेक्षित असणारा) प्रवेश केल्यामुळे दिल्लीतील भाजप नेतृत्वही महाराष्ट्रावाबत निश्चितच सावध झाले असणार आहे. ते आता पक्षातील कोणा नेत्याला आणखी दूर जाऊ देणार नाहीत. त्याचवेळी पंकजाताई मुंडे यांनाही पक्षाला आपली ताकद दाखवण्याची संधी या निमित्ताने मिळू शकते, त्याचा फायदा पंकजाताई घेतील असे दिसते.

त्या ही निवडणूक लढल्या आणि जिंकू शकल्या तर "लोकांच्या मनातील" नेतृत्व ही प्रतिमा त्यांना सिद्ध करता येणार आहे. आजच्या परिस्थितीत भाजप कडून या निवडणुकीसाठी या मतदारसंघात चर्चा होत असलेले उमेदवाराबद्दल आजच बोलण्याची गरज नसावी. पण भाजपला आपली ताकद दाखवून सिद्ध करण्यासाठी मराठवाड्यात तरी नक्कीच पंकजाताई यांची गरज आहे आणि पंकजाताई यांनाही विधानसभेतील पराभवानंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी एका संधीची गरज आहे. ही संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आज त्यांना नक्कीच उपलब्द्ध झाली आहे. पक्ष आणि ताई दोघांना गरज असल्यामुळे ते दोघेही ही संधी सोडतील असे वाटत नाही. आणि त्यामुळेच उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत असावा असे दिसते. त्याच वेळी चर्चेत भाजपा कडून उमेदवार म्हणून माध्यमात असणारा कोणीही अद्याप इकडे फिरकलेलेही दिसत नाहीत त्यामुळे भाजप राष्ट्रवादीला या निवडणुकीतही झटका देणार आणि तगडा उमेदवार देणार या मताला दुजोरा मिळतो.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

_________