मुंबईत पेट्रोलची किंमत उच्चांकी पातळीवर

मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 97.34 तर डिझेलचा दर प्रतिलीटर 88.54 इतका आहे. मुंबईतील हा पेट्रोलचा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे.

मुंबईत पेट्रोलची किंमत उच्चांकी पातळीवर
petrol diesel rate

मुंबईत पेट्रोलची किंमत उच्चांकी पातळीवर

Petrol price in Mumbai is at an all time high

मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 97.34 तर डिझेलचा दर प्रतिलीटर 88.54 इतका आहे. मुंबईतील हा पेट्रोलचा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी  आता वरच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. त्यामुळे मुंबईत गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीने विक्रमी पातळी गाठली.

आज मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 97.34 तर डिझेलचा दर प्रतिलीटर 88.54 इतका आहे. मुंबईतील हा पेट्रोलचा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे. काल मुंबईत पेट्रोलची किंमत 97.16 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत 88.22 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली होती. 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे 27 फेब्रुवारीपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, या निवडणुकानंतर पेट्रोलचा प्रतिलीटर 3 रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटर 2 रुपयांनी महाग होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा हा वरच्या दिशेचा प्रवास आणखी काही काळ सुरु राहू शकतो. परिणामी अगोदरच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.


मुंबई: पेट्रोल- 97.34 , डिझेल 88.54
पुणे: पेट्रोल- 96.98, डिझेल 86.79

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

येत्या 6 महिन्यांत कच्च्या तेलाची किंमत विक्रमी वेगाने वाढणार आहे. जगभरात कोरोना लसीकरणाची मोहीम आणि प्रवासाची मागणी वाढल्यामुळे मागणीत दररोज 52 लाख बॅरलपर्यंत वाढ होऊ शकते. वृत्तसंस्था रॉयटर्सनेही याबाबतची माहिती दिलीय.कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरपर्यंत पोहोचू शकते. सध्याच्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्याच्या मदतीने ही मागणी पूर्ण होणार नाही.

 गोल्डमनने एका अहवालात म्हटले होते की, तिसऱ्या तिमाहीत कच्च्या तेलाच्या उत्पादनात दिवसाला 20 लाख बॅरेल्सची वाढ करावी लागू शकते.