भाजपा शिक्षक आघाडी कल्याण जिल्हा संयोजकपदी विनोद शेलकर यांची पुनर्नियुक्ती...
भाजपा शिक्षक आघाडी कल्याण जिल्हा संयोजकपदी विनोद शेलकर यांची पुनर्नियुक्ती भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली आहे.

भाजपा शिक्षक आघाडी कल्याण जिल्हा संयोजकपदी विनोद शेलकर यांची पुनर्नियुक्ती...
कल्याण : भाजपा शिक्षक आघाडी कल्याण जिल्हा संयोजकपदी विनोद शेलकर यांची पुनर्नियुक्ती भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली आहे.आतापर्यंत शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी अभ्यासपूर्ण काम विनोद शेलकर करत आहेत. त्याच कामाची पोचपावती पुनर्नियुक्तीने मिळाली आहे. यावेळी भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश सह संयोजक विकास पाटील उपस्थित होते.
स्वतःच्या कामापासूनच समस्यांसाठी कसे लढावे,आपला न्याय हक्क, त्यासाठीचा अभ्यास, पत्रव्यवहार याचे बाळकडू माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्याकडून लाभले.अन्नाच्या कार्याला असेच त्यांच्या सारखे निस्वार्थ पध्द्तीने अविरत सुरू ठेवणे हीच खरी आदरांजली असेल.मोते सरांकडून कडून मिळालेली प्रेरणा आणि आशिर्वाद,प्रदेश सहसंयोजक, मार्गदर्शक विकास पाटील आणि कोकण विभाग संयोजक,अभ्यासू नेतृत्व एन. एम. भामरे यांच्या मार्गदर्शनाने शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने काम करीत राहिल असे विनोद शेलकर यांनी सांगीतले.
विनोद शेलकर हे गुरुनानक इंग्लिश हायस्कुल आणि ज्यू. कॉलेज कल्याण येथे कलाशिक्षक असून त्यांनी कल्याण शहरातील सामाजिक कामात सातत्याने ठसा उमटविला आहे. त्याच्या कार्याचा आलेख त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, कलेच्या क्षेत्रात काम करून निर्माण केला. २०१० मध्ये आविष्कार एज्युकेर फाउंडेशन इंजिओची स्थापना करून त्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली. संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य कल्याण जिल्हा अध्यक्ष,कल्याण तालुका कलाध्यापक संघ,सचिव. युवा अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, सहकार्यवाहक जलपरिषद महाराष्ट्र राज्य आशा अनेक पदांवर ते कार्य करत आपल्या कार्याचा आलेख उंचावत आहेत.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________